आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची लायब्ररीमध्ये जाऊन अँड प्रताप ढाकणे यांनी कार्यकर्ते घेऊन भेट दिली. याचा पध्दतीने ढाकणे यांनी शेवगाव-पाथर्डी मतदार संघात जनसंपर्क सुरु केला आहे.
खरं तर विद्यार्थी वर्ग हा लोकशाही प्रकियेमधला महत्वाचा घटक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुळ प्रश्न समजून त्यावर ठोस पावले उचलायला हवीत. त्यांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा द्यायला हव्यात या मताचा मी आहे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांशी चर्चा करतांना त्यांच्या भागातले अनेक प्रश्न नव्याने समस्या त्यांनी जाणून घेत, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतांना येणाऱ्या अडचणी त्यांनी बोलतांना सांगितल्या. त्यामुळे या विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना लागणाऱ्या सुख सुविधेसाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेल, असा शब्द त्यांनी दिला.
ढाकणे यांनी वकिल मित्रांच्या निमत्रंणावरून वकिल संघाच्या कार्यलयात सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, मी पेशानं वकील असल्यामुळे वकिली व्यवसायातील अडीअडचणी मला माहिती आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करतांना अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. माझ्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. जणू घरच्याच माणसांशी बोलत आहे असा हा अनुभव होता.
शहरामध्ये कोर्टाच्या नवीन इमारतीचं बांधकाम करण्यात यावं, अशी मागणी या वकिलांनी यावेळी केली.
जर जनतेने संधी दिली तर मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0 Comments