Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखिल भारतीय कामगार संघटनेचे नेते भाऊसाहेब उनवणे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
    अहमदनगर -    अखिल भारतीय कामगार संघटनेचे नेते भाऊसाहेब उनवणे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व कुठलाही डामडौल न करता साजरा करण्यात आला. यानिमित्त अन्नदान करण्यात आले. कामगार नेते श्री. भाऊसाहेब उनवणे यांचा वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांच्या वतीने व कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी किरण बांगर, बापू शिर्के, रघुनाथ थोरात, नगरसेवक अक्षय उनवणे, डॉ. रोहन उनवणे, अजय साळवे, पावलस पवार आदी उपस्थित होते.
     शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी श्री. उनवणे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या, तसेच स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख, शुभम बेद्रे, आसीफ सुलतान, बाबा खान, रेवजी नांगरे आदींनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
     यावेळी बोलताना श्री. उनवणे म्हणाले की, कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय कामगार संघटनेने नेहमीच प्रयत्न केले आहेत. गोरगरीब कामगारांचे प्रश्‍न सोडविले आहेत. सामाजिक कार्याला नेहमीच आपण प्राधान्य दिले आहे. समाजहिताची कामे करताना अनेक अडचणी येतात. मात्र, या अडचणींवर मात करून मार्गक्रमण करीत आलो आहे. यापुढील काळातही कामगार हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. हे सर्व कामगार बंधू म्हणजे माझे कुटुंबच आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत वाढदिवस साधेपणाने साजरा केला, तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे ते म्हणाले.
     पावलस पवार म्हणाले की, भाऊसाहेब उनवणे यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कामगारांसाठी व्यथित केले आहे. अनेक कामगार त्यांच्याकडे त्यांचे प्रश्‍न घेऊन येतात. ते सोडविण्यासाठी त्यांची कायम धडपड असते. नित्य कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यात ते व्यस्त असतात. जीवनात अनेक चढउतार आले तरी ते कधीही बधले नाहीत. प्रत्येक गोष्टीचा धिराने सामना करीत सामाजिक कार्य त्यांनी सुरूच ठेवले, असे ते म्हणाले. बापू शिर्के यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण बांगर यांनी आभार मानले.

   अखिल भारतीय कामगार संघटनेचे नेते भाऊसाहेब उनवणे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी किरण बांगर, बापू शिर्के, रघुनाथ थोरात, नगरसेवक अक्षय उनवणे, डॉ. रोहन उनवणे, अजय साळवे, पावलस पवार आदी उपस्थित होते. (छाया/बबलू शेख, नगर.)

Post a Comment

0 Comments