Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र व हरियाणा राज्यात पहिल्या टप्पात विधानसभा निवडणुका

21 ऑक्टोबरला मतदान, मतमोजणी दि.24 ऑक्टोबरला होणार 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली - अनेक दिवसांपासून प्रत्यक्षित असणारी विधानसभा निवडणूक अखेर दिवाळीपूर्वीच जाहीर झाली. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही विधानसभा निवडणुका शनिवारी (दि.21) तारीखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत. मतदान हे दि.21 ऑक्टोबर रोजी होणार असून, मतमोजणी दि.24 ऑक्टोबरला रोजी होणार आहे. महाराष्ट्र व हरियाणात या विधानसभा निवडणुका एकाचवेळी होणार आहेत.
 महाराष्ट्रामध्ये 8.84 कोटी मतदान असूून तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. दोन्ही राज्यात मिळून विधानसभेच्या निवडणुकीसाठी 378 जागा आहेत. यापैकी महाराष्ट्रात 288 जागा असून उर्वरित 90 जागा या हरियाणात आहे.
 विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना 28 लाखांपर्यंत खर्च करण्याची सवलत आहे. प्रत्येक उमेदवारांना अग्नीशस्त्रे जमा करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रचारात प्लॉस्टिकचा उपयोग न करण्याचे आवाहन आहे. सोशल मिडियावर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. विविध राज्यात 64 ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उलथापालथ झाली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मोठी चुरस पाहण्यास मिळणार आहे. भाजपा-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांंच्यामध्ये समोरासमोर लढती होणार आहेत. वंचित आघाडीही 288 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे बहुतेक ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 आता निवडणूक तारीख जाहीर झाली पण आता शिवसेना-भाजपाची युती होईल का? यासाठी युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांची मुंबईकडे लक्ष लागले आहे. वास्तविक पाहता युतीचे प्रत्येकजण युती झाली तर नाही झाली तर याबाबत शिवसेनेला अथवा भाजपाला काय तोटा होऊ शकतो, याबाबत अंदाज बांधत आहे. त्यामुळे युती न झाल्यास अनेक दुसर्‍या पक्षातील इच्छुकांनी सत्ताधारी पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी प्रयत्नात आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही चांगलीच रंगदार होणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments