आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - प्रशासकीय सेवेमध्ये नवीन उपक्रम राबवून लोकहितासाठी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने माजी सनदी अधिकारी डॉ.एस. एस. गडकरी यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. यावर्षीचा पुरस्कार नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना महाराष्ट्र विभागीय शाखेचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
मंत्रालयात भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सनदी अधिकारी राहुल द्विवेदी यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि 10 हजार रूपये रोख असे देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरुप आहे.
0 Comments