Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासकीय संदेश प्रसार धोरणातील बदलाने छोट्या वृत्तपत्रांना दिलासा ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
मुंबई - महाराष्ट्र सरकारने शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018फफ हे नवीन जाहिरात धोरण 18 डिसेंबर 2018 रोजी प्रसिध्द केले. या नवीन धोरणामध्ये वृत्तपत्रांची वार्षिक अंक संख्या, साईज, वार्षिक पडताळणी याविषयी अन्यायकारक वाढाव बदल केल्याने छोट्या वृत्तपत्रांच्या वाटचालीत फार मोठी अडचण निर्माण झाली. या अन्यायकारक धोरणास छोट्या वृत्तपत्रांचे मालक संपादकांनी कडाडून विरोध केला. राज्यातील विविध संघटना, पदाधिकारी यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, माहिती महासंचालक, संचालक यांच्या भेटी घेऊन अन्यायकारक तरतूदी दूर करण्यासाठई पत्रव्यवहार केला. निवेदने दिली. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातील संपादकांनी 14 ऑगस्ट 2019 रोजी माहीत महासंचालक ब्रिजेश सिंह यांची भेट घेऊन शासकीय संदेश प्रसार धोरणातील अडचणीबाबत हरकती नोंदविल्या मुख्यमंत्र्यांना निवेदने दिली. महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांचे समवेत यासंबधी बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात दादा पाटील यांना भेटून छोट्या वृत्तपत्रांना जाचक आटींतून मुक्तता करण्यासाठी निवेदन देण्यात आले. संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार स्मिता गुणे व विनय गुणे यांनी ही भेट घडवून आणली. तसेच पुढील पाठपुरावा करण्यात आला. स्मिता गुणे यांनीही हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकार्यांनी विविध ठिकाणी स्मरणपत्रे व निवेदने देऊन छोट्या वृत्तपत्रांच्या संपादकांनी, संघटनांनी जाचक अटी दूर करण्याचा आग्रह धरला. पाठपुरावा केला. संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे, राज्य समन्वयक नरेंद्र लचके, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्रजी वाबळे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष रवीद्र बेडकीहाळ, साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषदेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे एस्. एम. देशमुख, महाराष्ट्र प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष इलियास खान, दैनिक आव्हानचे संपादक प्रफुल्ल नेवे, नाशिक विभाग प्रमुख विलास कटयारे, बीड जिल्हा पत्रकार संघाचे नरेंद्र कांकरिया, अरूण कुलकर्णी, विष्णुकूमार चौधरी, या सर्वांनी विशेष प्रयत्न केल्याने दि. 17/09/2019 रोजी शासकीय संदेश प्रसार नियमावलीत अंशत: सकारात्मक बदल केले आहे. या बदलाचे परिपत्रक प्रकाशित करतांना संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेच्या प्रयत्नांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या नवीन बदलानुसार वृत्तपत्रांची पडताळणी एक वर्षा ऐवजी दर दोन वर्षांनी केली जाईल. दैनिकाची साईज 7600 चौसेमी ऐवजी 6400 व साप्ताहिकाची साईज 3312 चौसेमी अशी राहील. दैनिकांसाठी प्रतिवर्षी 300 अंक, सायं दैनिकांसाठी 280 अंक, साप्ताहिकांसाढटी 46 अंक अशी दुरूस्ती करण्यात आली आहे.  या दुरूस्तीमुळे छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील छोट्या वृत्तपत्राच्या संपादक -मालकांनी, संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर, महासंचालक, संचालक यांना धन्यवाद दिले आहेत.

Post a Comment

0 Comments