Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिंदा फाटा ते मराठवाडी मार्गास राज्यमार्ग 'प्रस्तावास' मंजुरी - तुळशीराम सानप


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

पाथर्डी - अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या महिंदा फाटा ते मराठवाडी (ता.आष्टी जि.बीड) या मार्गास राज्यमार्गाचा दर्जा मिळाला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप (रा.चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी ता.पाथर्डी, जि.अ.नगर) यांनी पाठपुरावा केला होता. अहमदनगर व बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागातून हा राज्यमार्ग जाणार आहे.
सानप यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महिंदा फाटा ते मराठवाडी या मार्गास राज्यमार्गाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली होती. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी नाशिक व औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता यांना पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले आहेत. या मार्गावर महिंदा, पिरेवाडीफाटा, माणिकदौंडी, पत्र्याचा तांडा, सावरगाव, शेजळा, देऊळगाव, मराठवाडी अशी गावे येतात. या रस्त्याची रुंदी ३.७० मी. आहे. या मार्गास राज्यमार्गाचा दर्जा मिळावून ५.५० मी. रुंदीचा हा मार्ग असणार आहे, अशी माहिती तुळशीराम सानप यांनी दिली.


Post a Comment

0 Comments