आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पाईपलाईन रस्त्यावर असणाऱ्या वाणीनगर या उपनगराचे प्रवेशद्वाराची कमान बुधवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास पडली.
सकाळी जाणाऱ्या नागरिकांना कमान पडल्याचे दिसताच त्यांनी स्थानिक नगरसेवकांना याची माहिती दिली. नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण, नितीन बारस्कर, योगेश ठुबे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संपत बारस्कर यांनी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सुरेश इथापे यांना माहिती दिली. इथापे यांच्यासह अभियंता मनोज पारखे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कमान कोसळल्याचे सांगण्यात येत असून, यात कुठलाही जीवितहानी झालेली नाही. कमान कोसळल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
0 Comments