Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र बँकेतील खातेदाराचे पैसे रिटर्न चार्जेसच्या नावाखाली गायब

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कोपरगाव - मेहनतीने कमावलेला पैसा सुरक्षित असावा,तसेच शासकीय योजनांच्या लाभासाठी जनधन योजनेच्या माध्यमातून अनेकांनी
राष्ट्रीयकृत बँकांत आपली खाती उघडली.मात्र तो पैसाही कुठलेही कारण न देता रिटर्न चार्जेसच्या नावे खात्यावरुन कमी होत असल्यामुळे खातेदार अडचणीत सापडल्याची बाब पुढे आली  आहे.
      नामवंत महाराष्ट्र बँकेच्या तालुक्यातील दहेगाव(बोलका)शाखेत हा कारभार उघडकीस आल्यामुळे शाखेतील खातेदारांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. या शाखेवर वरिष्ठांचा वचक नसल्याचे अनुभव यापुर्वीही उघडकीस आले असुन सकाळी बँकेत खातेदारांना कर्मचारी येण्याची वाट बघत बसावी लागत असल्याचा प्रकार नित्याचाच आहे. खातेदारांशी अरेरावीने बोलणे,तक्रारींची दखल न घेणे हे यापूर्वी अनेकांनी अनुभवले असल्याचे नागरिकांंचे म्हणणे आहे.
     पढेगाव ग्रामपंचायतचे शिपाई नारायण चांगदेव शिंदे यांचे या बँकेत खाते नंबर-६०२०२७५३५३८ आहे. यावरच ग्रामपंचायतचे मासिक मानधन जमा होत असते.मात्र सप्टेंबर २०१८पासून त्यांच्या खात्यावरील सुमारे ३७हजार रुपये रिटन चार्जेसच्या खात्यातून कमी झालेले आहे.याबाबत वारंवार त्यांनी शाखा व्यवस्थापनाशी संपर्क करुन लेखी तक्रार देऊनही हा प्रकार सुरुच आहे.खात्यातून दि.२१एप्रिल२०१९या एकाच दिवशी तब्बल २६ वेळेस ११८ रुपयांचे रिटर्न चार्जेस लागले आहे. अशीच पुनरावृत्ती ३५४रुपयांची दि.१७ जुनपासून झालेली आहे. शिवाय या खात्याला होल्ड लागलेला असल्यामुळे खातेदाराला रक्कमच वर्षभरापासून रक्कमच काढता येत नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
     
 सुरक्षित ठेव म्हणून बँकेकडे पाहिले जाते मात्र तिथे असा अनुभव येत असेल तर अक्षर ओळख नसणाऱ्यांनी काय करावे ?
महाराष्ट्र बँक,दहेगाव शाखेशी बहुतांशी शेतकरी खातेदार आहेत. असा प्रकार घडल्याने खातेदार चिंताग्रस्त आहे.अशी समस्या ज्याला अक्षर ओळखच नाही अशा आशिक्षित खातेदाराच्या नशिबी आल्यास बँक व्यवस्थापक वर हात करणार असेल तर त्याने न्याय मागावा कुणाकडे हा खरा प्रश्न आहे.

महाराष्ट्र बँकेच्या दहेगाव शाखेतून माझ्या खात्यावरील सुमारे ३७ हजाराची रक्कम कट झाली. बँक कर्मचारी वर्षभरापासून उडवाउडवीची उत्तरे देत असून,आजारपणात देखील मला पैशे काढता आले नाही.माझे पैसे तात्काळ खात्यावर जमा करुन संबंधित दोषी व्यवस्थापनावर कारवाई व्हावी.
नारायण शिंदे
 (शिपाई ग्रा.पंचायत पढेगाव ता.कोपरगाव)
       
खातेदाराच्या खात्यावरील वजावट रक्कम तांत्रिक अडचणीमुळे झाली आहे. मी काहीही करु शकत नाही.त्यांनी झोनल आँफिसशी संपर्क करावा. फायनान्स कंपनी आणि सर्व्हिस ब्रँच यांच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. वर्षभरात अनाठायी कट झालेली रक्कम आठ ते दहा दिवसांत तक्रारदाराच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न करतो. 
सुभाष कदम, शाखा व्यवस्थापक,महाराष्ट्र बँक,दहेगांव बोलका ता.कोपरगाव

Post a Comment

0 Comments