Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी मंत्री बी. जे.खताळ पाटील यांचे निधन




आँनलाईन  न्यूज  नेटवर्क
नगर रिपोर्टर
संगमनेर - राजकारणातील चतुरस्त्र व्यक्तीमत्व आणि तत्वनिष्ठ राजकारण, सहकार, साहित्य, शिक्षण, सिंचन अशा विविध क्षेत्रात योगदान असणारे माजी मंत्री बी.जे.खताळ पाटील यांचे सोमवारी पहाटे 2 वाजून 10 मिनीटांनी निधन झाले. संगमनेर येथील राहात्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 101 वर्षाचे होते. सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर संगमनेर अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
संगमनेत तालुक्यातील धांदरफळ येथे 16 मार्च 1919 रोजी त्यांचा जन्म झाला. त्याकाळी नामांकित वकील म्हणून नावलौकीक होता. 1952 मध्ये त्यांनी संगमनेर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढविली. तत्कालीन मातब्बर नेते दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 1962 मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या भुमिकेला पाठींबा देण्यासाठी त्यांनी 1957 ची निवडणूक लढविण्यास पक्षाला नकार दिला होता. संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना उभारणीची पायाभरणीही त्यांनीच केली. 1985 पर्यंत त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. राज्याची विविध मंत्रालये त्यांनी हाताळली. सिंचन क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या काळात राज्यात अनेक मोठ्या धरणांची निर्मिती झाली.

परिचय असा-

 श्री. बी. जे. खताळ
-जन्म 26 मार्च 1919
धांदरफळ ( तालुका संगमनेर )
-शिक्षण – धांदरफळ, संगमनेर, बडोदा, पुणे इथे झाले
-सन 1943 ते 1962 याकाळात नामांकित वकील म्हणून नावलौकिक
-1952 ला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमधून पहिली निवडणूक लढवली, या निवडणुकीत दत्ता देशमुख यांच्याकडून पराभव
-1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र व्हावा असे मनापासून वाटत असल्याने मात्र कॉंग्रेसची भूमिका यासाठी अनुकूल नसल्याने निवडणूक लढविण्यास नकार दिला.
-1962 मध्ये पहिल्यांदा कॉंग्रेसच्या वतीने विजयी
-1958 च्या सुमारास संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना उभारणीची संकल्पना घेऊन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक (चीफ प्रमोटर) म्हणून कामाला सुरुवात. 1969 मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख, भास्करराव दुर्वे, भाऊसाहेब थोरात, दत्ताजीराव मोरे, पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची मोलाची साथ.
-राज्याच्या राजकारण, सहकार, शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख.
-1962 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील हयात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा.
-वयाच्या 65 व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून स्वयंप्रेरणेने निवृत्ती घेतल्यावर योगा, प्राणायाम, विपश्यना, चिंतन, मनन यात स्वतःला गुंतवून घेतले होते.
-सन 1962 ते 1985 या काळात आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर सातत्याने कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकीत विजयी.
-मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, विधी व न्याय, प्रसिद्धी, माहिती, परिवहन आदी खात्यांचे मंत्रिपद भूषविले.
-राज्यात त्यांच्या काळात सर्वाधिक धरणांची निर्मिती. कोल्हापूरचे दुधगंगा- वेदगंगा, सांगलीचे चांदोली – नांदोली, साताऱ्याचे धोम, पुण्याचे चासकमान, वर्ध्याचे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरी, याचबरोबर राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे कामही त्यांच्याच काळात.
-वयाच्या 93 वर्षी लिहायला सुरुवात केली आणि पुढील आठ नऊ वर्षात सात पुस्तके.

-प्रकाशित पुस्तके – अंतरीचे धावे, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर, लष्करी विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक

-मागील आठवड्यात वयाच्या 101 व्या वर्षी प्रकाशित झालेले वाळ्याची शाळा अशी एकूण सात पुस्तके.
-वाळ्याची शाळा हे पुस्तक वयाच्या 101 व्या वर्षी लिहून देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

Post a Comment

0 Comments