Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर येथील मायलेकाची मुळा धरणात जलसमाधी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर  – नगर शहरातील सातपुते कुटुंबातील आई व मुलगा मुळा धरणात जलसमाधी मिळाल्याची घटना रविवारी घडली.
आई, वडील व मुलगा असे सातपुते कुटुंबीय मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सातपुते कुटुंबियांचा मुलगा घसरून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी आई-वडिलांनी धरणात उडी मारली. लाटेबरोबर बाहेर येऊन पिता बचावले. परंतु मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.  रात्री दोघांचे मृतदेह धरणातून काढण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, नगर येथील बोरूडे मळा येथील रहिवासी असलेले सातपुते कुटुंब व अन्य कुटूंबाबरोबर मुळा धरण पाहण्यासाठी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गेले होते. धरणावर फिरुन झाल्यावर गणेश सातपुते (43), पूजा गणेश सातपुते (37) व ओंकार गणेश सातपुते (13) हे तिघे जण पाण्याजवळ उभे होते. यावेळी मुलगा ओंकारचा खडकावरून पाय घसरल्याने तो धरणाच्या पाण्यात पडला. मुलगा पाण्यात पडल्याचे पाहताच वडील गणेश सातपुते यांनी मुलाला वाचवण्यासाठी उडी टाकली. पण या बाप लेकाला पाण्यात पोहता येत नसल्याने दोघेही बुडून लागले. आपला नवरा व मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून क्षणाचा विलंब न करता पूजा सातपुते यांनी नव-याला हात देऊन बाहेर काढल्याने लाटेबरोबर बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. दरम्यान पुजा यांनी मुलगा यास वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे पाण्यात बुडाले.
पत्नी व मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून गणेश यांनी दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरड  केली.  परंतु आई-मुलगा वाचविण्यात यश आले नाही.

Post a Comment

0 Comments