Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सर्वसामान्याचे आश्रु पुसण्याचे काम स्व. मारुतराव घुले पाटलांनी केले : मा. आ. चंद्रशेखर घुलेस्व. घुले यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बोधेगाव - निसर्गाची साथ नसताना देखीलअत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये पूर्व भागातील  तळागाळातील सर्वसामान्याचा विचार डोळ्यासमोर ठेउन स्व मारुतराव घुले पाटील यांनी संस्था, संघटनेच्या माध्यमातून गोररगरिबांचे आश्रु पुसण्याचे भरीव कामाबरोबर संस्कारातून  दिलेले विचार रुजविण्याचे भरीव काम केले असल्याचे प्रतिपादन माजी आ चंद्रशेखर घुले यांनी व्यक्त केले
 शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे कृषी उत्प्नन बाजार समितीच्या आवारात स्व. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांची ८९ व्या जयंती जेष्ठ वृद्ध व्यक्ती महंताचा सन्मान व शालेय वकृत्व स्पर्धेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव व सन्मान यावेळी प्रमुखांच्या उपस्थित करण्यात करण्यात आला. यावेळी बोलताना श्री घुले म्हणाले अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही वीज,पाणी, आदी मूलभूत प्रश्न हक्काने  मार्गी लागण्यासाठी स्व मारुतराव घुले पाटील यांनी अथक प्रयत्न केले जुन्या काळातील लोकांनी विकासाचा पाया रचवून कळस उभा केला हे विसरून चालणार नाही त्याचे वृद्धमंडळी साक्षीदार आहेत ते पाहून स्व साहेब आपल्यात हयात असल्याचे दिसत आहे
     यावेळी स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्या जयंती निमित्त जेष्ठ नागरिक व परिसरातील संत  महंत तसेच शाळेतील घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यामध्ये मूंगादेवी विद्यालयाचे विद्यार्थी राजश्री उद्धव पठाडे, निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक, ऋतुजा विश्वास तनपुरे रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक, सिद्धांत शिवाजी राजेभोसले, संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक,लाडजळगाव हायस्कुलचे विद्यार्थीमध्ये गायत्री सूभाष कणसे वकृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक, दीपक पोपट घुमरे
 सायकलिंग प्रथम क्रमांक,दिव्या विष्णु पादर संगीत खुर्ची प्रथम क्रमांक, तसेच रामेश्वरदास विद्यालयतील आश्विनी बंडू गोरे निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक,रमेश ज्योती खलासे कबड्डी स्पर्धा प्रथम क्रमांक, किरण बाळासाहेब नाचन  सायकल प्रथम क्रमांक मिळवला.
     कार्यक्रमास केदारेश्वर देवस्थानचे मठाधिपती हभप बाबागिरी महाराज, हभप मारुती झिरपे, नंदकिशोर महाराज, शिवाजी महाराज ढवळे, उद्धव महाराज दसपुते, विष्णू गोर्डे, भाऊराव पन्हाळकर कृषी उत्पन्न बाजार समितिचे संचालक रामनाथ राजपुरे, प्रल्हाद शिंदे, राजेंद्र ढमढेरे, बप्पासाहेब पारनेरे, सुधाकर तहकीक, ज्ञानेश्वरचे संचालक मोहनराव देशमुख,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने,केदारेश्वर चे उपाध्यक्ष प्रकाश घनवट, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हनुमान पातकळ, मोहनराव गलांडे,मिलिंद गायकवाड, भाऊराव भोंगळे,रामजी अंधारे, माणिक शिंदे,बाळासाहेब देशमुख, उपसभापती शिवाजीराव नेमाणे,संतोष पावसे,,कुंडलिक घोरतळे,ज्ञानदेव घोरतळे एकनाथ कसाळ, बापू खताळ, भास्कर खेडकर, गंगाधर घोरतळे, यांच्यासह रामेश्वरदास विद्यालय व  लाडजळगाव आणि मुंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यासह  परिसरातीलपदाधिकारी व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्प्नन बाजार समितिचे संचालक रामनाथ राजपुरे यांनी केले.
सूत्रसंचालन रामकिसन नीळ , विकास भराट
 यांनी केले.  आभार  भाऊराव भोंगळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments