Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी बाजार समिती गोडावूनचे अँड ढाकणे यांच्या हस्ते उदघाटन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी -   कृषी उत्पन्न बाजार समितीतील तिसगाव बाजार येथे 1 मे.टन साठवण क्षमतेच्या गोडावूनचं उदघाटन अँड प्रताप ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीचे सभापती, उपसभापती, संचालक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 दरम्यान पाथर्डी येथील मुख्य कार्यालय आवारातील 25 लाख रूपयाच्या रस्त्याचेही भूमीपूजन माझ्या हस्ते करण्यात आले.
पाथर्डी शहरातील बैल बाजार सुशोभिकरणाच्या 5 लाख रूपयाचे भूमीपूजनही केले.
 यावेळी अँड ढाकणे म्हणाले की, गोडावूनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला माल साठवण्यासाठी उपयोग होणार आहे. पाथर्डी शेवगांव भागातील विधायक कामासांठी मी नेहमीच तत्पर असतो आणि येणाऱ्या काळातही मी नेहमीच या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments