आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सोलापूर - शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या निषेधार्थ व उजनी धरणातून हिप्परगा तलावात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे लोकशाही मार्गाने हिप्परगा तलावातील पाणवठा येथे बेमुदत आमरण उपोषणास बसलेले असून हिप्परगा तलावात पाणी आल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा ठाम निश्चय उपोषणकर्ते आणि छावा संघटनेने केलेला आहे.*
हिप्परगा तलावाची क्षमता दोन टीएमसी असून सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगा, हगलूर, भोगाव, बाणेगांव, राळेरास, मार्डी, तरटगांव, एकुरगे, ऊळे व दक्षिण सोलापुरातील चौदा गावातील पाणी पुरवठा योजना या तलावावर अवलंबून आहेत. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून हिप्परगा तलावात पाणीच नाही. तसेच हिप्परगा तलावातील पाणी संपल्याने कित्येक महिन्यांपासून तलावातुन होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यंदा पावसाला संपत आला तरीही अद्याप तलाव कोरडाच आहे.
त्यामुळे सोलापूर शहर आणि उत्तर व दक्षिण तालुक्यातील दुष्काळी गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी उजनी धरणातुन डाव्या कालव्यातून कारंबा शाखेला सोडलेले पाणी पंपिंग करून कॅनॉलव्दारे हिप्परगा तलावात पाणी सोडावे, यासाठी छावा संघटनेने सातत्याने प्रशासकीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करूनही यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही. डाव्या कालव्यातून कारंबा शाखेच्या कॅनॉलचा टेलएंड हिप्परगा तलावाजवळ आहे. तसेच टेल टु हेड असे पाणी सोडण्याचा नियम असतानाही शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या भ्रष्ट कारभारामुळे हिप्परगा तलावात टेल टु हेड प्रमाणे कधीच पाणी आले नाही.
त्यामुळे शासकीय प्रशासकीय यंत्रणेच्या निषेधार्थ व उजनी धरणातून हिप्परगा तलावात तातडीने पाणी सोडावे यासाठी दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी ठीक - 11:00 वाजलेपासून राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे लोकशाही मार्गाने हिप्परगा तलावातील पाणवठा येथे बेमुदत आमरण उपोषणास बसलेले असून हिप्परगा तलावात पाणी आल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा ठाम निश्चय संघटनेने केलेला आहे.
यावेळी उपोषणकर्ते रतिकांत पाटील यांना प्रोत्साहन व साथ देण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, कार्याध्यक्ष संजय पारवे, अविनाश पाटील, कुमार भिंगारे, चंद्रकांत सुरवसे, दादा सुरवसे, नागनाथ काटे, शशी शिंदे, उमेश भगत, सुजीत उंबरे, पिंटू कापसे, युवराज पवार, शरद काटे, गणेश मोरे, निलेश मोरे आणि संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले.
0 Comments