Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा शासकीय आदेश जारीमाजी आमदार केशवराव आंधळे यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच शासनाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावांने ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा आदेश शासनाने निर्गमित केला  आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशवराव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
   ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आयुष्यभर संघर्ष केला, लढा दिला. सरकारने त्यांच्या नांवाने स्थापन केलेले ऊसतोड महामंडळ हा राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांच्या भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. ऊसतोड   कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी महामंडळ लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी ऊसतोड संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. सुरवातीला महामंडळा ऐवजी ऊसतोड कामगार योजना करण्यात आली होती, परंतु ऊसतोड मजूरांच्या भावना लक्षात घेऊन ना. पंकजाताई मुंडे यांनी महामंडळाच स्थापन व्हावे यासाठी आग्रह धरला आणि महामंडळाचा आराखडाही अंतिम केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सरकारने 'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ' स्थापन केले व तसा आदेश निर्गमित केला.

केशवराव आंधळे नवे अध्यक्ष
'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ' असे नांव या महामंडळाचे आता असणार आहे, या महामंडळा करिता आकस्मिकता निधीमधून १४५ कोटी इतका निधी मंजूर करण्यात यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या नावांची शिफारस करण्यात आली असून अन्य आठ सदस्यही त्यात असणार आहेत. दरम्यान, ऊसतोड मजूरांच्या बाजूने त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या नेत्या   ना. पंकजाताई मुंडे यांनी राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांच्या भावना लक्षात घेऊन मुंडे साहेबांच्या नांवाने महामंडळ स्थापन केल्याबद्दल कामगारांनी आनंद व्यक्त केला असून ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.


Post a Comment

0 Comments