Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी डॉ.संतोष मुंडे यांची फेर निवड


युवकांच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करणार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
परळी वैजनाथ - येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.संतोष मुंडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. तसेच नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले. डॉ.संतोष मुंडे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल अनेकांकडून पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. दरम्यान येणार्या काळात युवकांच्या माध्यमातुन पक्ष संघटना मजबुत व वाढविण्यासाठी सदैव तत्पर असलेल्याचे डॉ संतोष मुंडे यांनी सांगितले.
     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार, आ.अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील डॉ संतोष मुंडे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र डॉ संतोष मुंडे यांना प्रदेश अध्यक्ष शेख महेबुब,कार्याअध्यक्ष रविकांत वरपे ,सूरज चव्हाण यांनी पाठवले आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची धेय्य धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा आम्हाला विश्वास आहे. असा मजकूर पत्रात आहे.
          डॉ.संतोष मुंडे हे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या सहवासात तयार झालेले युवक नेतृत्व आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जबाबदारी संपूर्णपणे चांगल्याप्रकारे पारपाडली आहे. डॉ संतोष मुंडे यांनी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक शाखांचे उद्घाटन करून युवकांची फळी निर्माण करून या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ताकद वाढण्यासाठी प्रयत्न केले व पक्षसंघटना वाढवली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक आंदालनात सहभाग दर्शवित अनेक प्रश्न सोडविले आहेत.  त्यांच्याकडे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील  पक्ष निरीक्षक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यांनी यापुर्वी अनेक पदांवर काम केले असून, बीड जिल्हा व परळीसह संपुर्ण राज्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे. युवकांमध्ये ते लोकप्रिय असून, पक्षाच्या कामांसह विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. डॉ संतोष मुंडे यांची येणा-या विधानसभा निवडणुक लक्षात घेवुन त्यांच्या याच कार्याची दखल घेवुन त्यांना आता पक्षाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. 
          राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आघाड्यांच्या पदाधिकारी व नागरिकांचा आशीर्वाद, अनेक सहकार्यांच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन पुढील वाटचाल जोमाने करणारं व युवकांच्या माध्यमातुन पक्षाचे संघटन मजबुत करण्याचा निर्धार यावेळी डॉ संतोष मुंडे यांनी व्यक्त करून निवडीबद्दल पक्षाचे व नेतृत्वाचे आ.धनंजय मुंडे साहेबाचे आभार व्यक्त केले.
 आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना मला प्रदेश उपाध्यक्ष पदांची संधी मिळाली याचा विशेष आनंद आहे. पक्ष संघटना सदैव तत्पर असते. त्याच्या भक्कम बळावरच माझी वाटचाल असेल. लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयाची पुनरावृत्ती विधानसभेत निश्चितच होईल. व येणारा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल.
डॉ.संतोष मुंडे
नवनिर्वाचित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे
प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
–------/////----
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
संपादक बाबा ढाकणे मो.9764983002

Post a Comment

0 Comments