Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वंचित बहुजन अघाडीची सत्ता संपादन महारँली

 

 आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - वंचित बहुजन आघाडी ची 8 सप्टेंबर पासून नागपुर संविधान चौक येथून महारँलीस प्रारंभ झाला असून रँलीचा समारोप कोल्हापुर येथे होणार आहे. महारँलीचे नेतॄत्व व्हिबीए संसदीय मंडळ सदस्य  अण्णाराव पाटील हे करीत आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर आव्हाड यांनी दिली.
राज्यातील जनता त्यांचे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीकड़े आशेने पाहत आहे. सध्याचे  सरकार जनतेच्या समस्या , विकासाचे प्रश्न यावर चर्चा करीत नाही. मात्र आम्ही असे मानतो की, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाण्याची समस्या , शेती व उद्योग कारखाने ,ग्रामीण विकास , नागरी सुविधा अश्या विकासाच्या अजेंड्यावर महारैली मधून चर्चा
घड़वली पाहिजे. जनतेच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेतल्या पाहिजे.
 महारैली विदर्भात नागपूर येथून  सुरु झाली असून  संपूर्ण मराठवाड़ा मार्गे पश्चिम महाराष्ट्रात येणार आहे. कोल्हापुर येथे 18 सप्टेंबर रोजी या महारँलीची  सांगता होणार आहे.महारँली करिता मान्यवर नेते इतर स्टार प्रचारक देखील असणार आहेत.                                                       
वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महारँली
नियोजित कार्यक्रम या प्रमाणे आहे दि.८ सप्टेंबर
नागपूर संविधान चौक ते हिंगणा, सेलू, वर्धा ८ सप्टेंबर, २०१९ वर्धा, देवळी, राळेगाव, यवतमाळ
दि.९ सप्टेंबरला यवतमाळ कळंब, बाभूळगाव, नांदगाव, चांदूर, अमरावती
दि.९ सप्टेंबरला अमरावती, भातुकली, मुर्तीजापुर, अकोला. दि. १० सप्टेंबरला अकोला, शेगाव, खामगाव, मोताळा, बुलढाणा
दि.१० सप्टेंबरला बुलढाणा, चिखली, मेहकर, रिसोड, मालेगाव, वाशीम आदी ठिकाणी रँली झाली असून  आजरोजी दि.११ सप्टेंबरला, वाशिम
शेलू, हिंगोली, कळमनुरी, हदगाव, अर्धापूर, नांदेड
दि. १३ सप्टेंबरला नांदेड, पूर्णा, परभणीप, रभणी, मानवत, शेलू, परतूर, जालना.
दि.१४ सप्टेंबरला जालना बदनापूर, औरंगाबाद
गंगापूर, नेवासा (पांढरीपूल मार्गे शेगाव)पार्थडी,
शिरूरकासार, बीड. वडवणी, धारूर, केज, अंबाजोगाई, रेणापूर, लातूर,मुरुड, तेर, उस्मानाबाद
दि. १६ सप्टेंबरला उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, मोहोळ, माळशिरस, इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड, हडपसर, पुणे.  दि.१७ सप्टेंबरला पुणे, भोर (कापूरहोळ), खंडाळा, लोणद, फलटण, कोहरेगाव, सातारा. दि. 18 सप्टेंबरला सातारा, कराड, इस्लामपूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकंणगले, कोल्हापूर येथे महारैलीची सांगता होणार आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments