Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भोसेखिंडी द्वारे कुकडीचे पाणी सीना धरणात सोडण्याची मागणी


 भोसे खिंडीत सामुहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा  इशारा

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीगोंदे - पाऊसकाळ संपत आला असताना देखील कर्जत तालुक्यातील सीना मध्यम प्रकल्पात अत्यअल्प पाणीसाठा शिल्लक आहे,कमी पर्जन्यमान आणि कोरड्याठाख पडलेल्या विहीरी यामुळे सीना लाभश्रेत्रातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.
श्रीगोंदा,कर्जत,आष्टी तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी जळाळेली आहेत,सीना पट्यात जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज नेते मंडळी असताना देखील सीना परीसरातील शेतकरी वर्गावर पाण्याचे संकट कोसळले आहे.भोसे खिंडीतुन प्रत्यक्षात सीना धरणात थेंबभर पाणी सुध्दा आले नाही अशी तेथील शेतकर्‍यांची तक्रार आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी सीना लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाला सोबत घेऊन भोसे खिंडीतुन कुकडीचे पाणी सीना मध्यम प्रकल्पात तात्काळ सोडावे या मागणीसाठी आंदोलनरुपी जनलढा उभारण्याचा संकल्प केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस,सीना-कुकडी पाणी प्रश्न लढ्यातील ज्येष्ठ नेते पांडाभाऊ उगले,युवक क्रांती दलाचे युवा प्रदेशाध्यक्ष रवि लाटे,ग्रामपंचायत सदस्य विष्णु वाळके,कल्याण वाळके, विनोद भोस, प्रशांत भोस,गोरख उंडे,महेश उगले व सीना लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी
आपल्या व्यथा मांडताना सांगितले की,अपुरा पाऊस व पाण्याअभावी सीना लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या शिवारातील उभी पिके जळाळी आहेत,जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.शासनाने याची दखल घेत दीड टीएमसी कुकडीचे पाणी भोसेखिंडी द्वारे सीना मध्यम प्रकल्पात सोडावे अन्यता भोसे खिंडीत सामुहिक आत्मदहन आंदोलन केले जाईल असा गर्भीत इशारा प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments