Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यातील कर्मचारी ९ सप्टेबर रोजी संपावर

२३ संघटना संपामध्ये सहभागी होणार

नगर रिपोर्टर
शनिवार दि.७ सप्टेंबर
 अहमदनगर -  राज्य शासकीय - निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्य समन्वय समितीच्या आदेशान्वये सोमवार दि .९ सप्टेबर रोजी अहमदनगर जिल्हयात संप करण्याचा निर्णय जिल्हयातील सर्व संघटनांच्या समन्वय समितीने घेतला आहे.
       दि .७ सप्टेबर रोजी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत यासंदर्भात अहमदनगर जिल्हा राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची समन्वय समितीची बैठक पार पडली यात जिल्हा परीषदेतील बांधकाम , शिक्षण विभाग , आरोग्य , लेखा , लिपिक वर्गीय कर्मचारी , जिल्हयातील प्राथमिक शाळातील सर्व शिक्षक , माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व संस्था कर्मचारी , सर्व केंद्रप्रमुख , सर्व मुख्याध्यापक  व सर्व विस्तार अधिकारी सहभागी होणार आहेत
        सोमवार दि .९ सप्टेबर रोजी सकाळी १० .०० वाजता जिल्हा परिषद अहमदनगर येथे सर्व जिल्हा समन्वय समितीतर्फ मा . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जि.प. अ . नगर यांना निवेदन देण्यात येणार आहे . त्यानंतर मा . जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येईल तसेच तालुका पातळीवर सर्व संघटनांच्या तालुका समन्वय समितीने मा . तहसिलदार साहेब व मा . गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येईल
       ९ सप्टेबरच्या संपातील प्रमुख मागण्या शासनाकडून मान्य न झाल्यास तसेच ठोस निर्णय न झाल्यास दि .११ सप्टेबर २०१९ पासून राज्य समन्वय समितीच्या धोरणानुसार बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे .
       जिल्हयातील सर्व कार्यालये व सर्व शाळा १०० % बंद राहणार असल्याने पालकांनी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. या राज्यव्यापी संपात सहभागी होऊन आपल्या एकजुटीच्या माध्यमातून उद्याचा संप यशस्वी करण्याचे  आवाहन समन्वय समितीने केले आहे.
संपामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, महाराष्ट्र राज्य जि.प. कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य जि .प. लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना ६१५, महाराष्ट्र राज्य जि.प. लेखा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक हक्क परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथ . शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेवा संघ, इंडीयन बहुजन टिचर्स असोसिएशन ( इब्टा ), महाराष्ट्र राज्य एकल प्राथ . शिक्षक संघ, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना, राज्य पदवीधर महासंघ, राज्य ऊर्दू प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना, महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना , महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटना, राज्य अल्पसंख्यांक कर्मचारी संघ आदी २३ संघटना सहभागी होणार आहेत.


Post a Comment

0 Comments