Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्य सहकारी बँकेच्या वतीने ऊस परिसंवादाचे आयोजन
नगर रिपोर्टर
सोलापूर - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने गुरुवार दि. 5 सप्टेंबर रोजी सोलापूर येथील जामगुंडी मंगल कार्यालयात शेतकर्‍यांसाठी ऊस परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार,मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभर चालणारा हा कार्यक्रम पाच सत्रांमध्ये विभागण्यात आला आहे.
पहिल्या सत्रात माळेगाव पुणे, येथील मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेशराव जगदाळे ‘ऊस उत्पादन खर्च व व्यवस्थापन‘ हा विषय शेतकर्‍यांसमोर मांडणार आहेत.
 दुसर्‍या सत्रात कृषी भूषण संजीव माने ‘बियाणे व ऊस लागवड‘ या विषयावर बोलणार आहेत.
 तिसर्‍या सत्रात तात्यासाहेब कोरे वारणाचे कार्यकारी संचालक शहाजी भगत ‘ऊस पीक व पाणी व्यवस्थापन‘ बाबत मार्गदर्शन करणार आहेत.
 चौथ्या सत्रात जवाहर साखर कारखान्याचे मुख्य कृषि अधिकारी किरण कांबळे ‘ऊस तोडणी व्यवस्थापन‘ याबाबत विचार मांडणार आहेत.
 पाचव्या सत्रात परिसंवादाची सांगता होणार असून, किटक शास्त्र कृषि विद्यालयाचे पांडूरंग मोहिते ‘ऊसावरील रोग किड व त्यावरील औैषधे‘
या महत्वाच्या विषयावर विवेचन करणार आहेत.
शेतकर्‍यांनी या परिसनवादास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments