Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणीनगर रिपोर्टर
राहुरी - कोंढवड- तांदुळवाडी येथील मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी मा.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोंढवड व तांदुळवाडी येथील गावकर्यानी निवेदनाद्वारे केली आहे.
     निवेदनात म्हटले आहे की, को.प. बंधारा मानोरीतील शिल्लक पाणी साठा प्रस्ताविक को.प.बंधारा देसवंडीसाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव तयार करून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांचेमार्फत शासनास मंजुरीसाठी सादर केला आहे. को.प.मानोरी येथील बंधारा पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याचा काही अंशी फायदा हा कोंढवड व तांदुळवाडी या गावाला होत होता.त्यामुळे कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांच्या प्रस्तावाने या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न निर्माण होणार आहे.जर देसवंडी येथील बंधारा हा कोंढवड- तांदुळवाडी येथे बांधल्यास या दोन्ही गावाबरोबर मुळा नदी तिरावर वरील बाजूस असलेल्या गावांना ही याचा फायदा होणार असल्याने या गावांमधील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून कोंढवड तांदुळवाडी येथील मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
      या मागणीचे राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना उत्तमराव म्हसे,तान्हाजीराव धसाळ, गोरक्षनाथ माळवदे, जगन्नाथ पंढरीनाथ म्हसे, मच्छिंद्र पेरणे, बाळासाहेब पेरणे,शरद पेरणे,राहुल म्हसे, राजेंद्र म्हसे, दत्तात्रय म्हसे,लक्ष्मण म्हसे, जगन्नाथ भाऊसाहेब म्हसे, रघुनाथ म्हसे,सुर्यभान म्हसे, साहेबराव म्हसे,विष्णु म्हसे, ऋषीकेश प्रभाकर म्हसे आदींनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments