Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-पाथर्डी वास्तव भाजपाचा अवास्तव भाजपास विरोध


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - अवास्तव भाजपात आलेल्यांनी वास्तव भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात अथवा कुठल्याही कल्पना न देता भाजपा कार्यकत्यांचा मेळावा जाहीर करणे ही बाब वास्तव भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या चागंलीच जिव्हारी लागली आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन कोणताही आदेश अथवा सूचना नसताना हा मेळाव्याचे प्रयोजन होते. परंतु काही जणांची कोणतीही सहमती नसताना मेळाव्याच्या पत्रिकेत नावे छापण्यात आली. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात वास्तव व अवास्तव भाजपात चांगलीच कलगीतुरा सुरू झाला आहे.
वास्तव भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अघोषित मेळाव्यास विरोध म्हणून तातडीने पत्रकार परिषद घेऊन शेवगाव भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर व पाथर्डीचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांनी त्या तथाकथित मेळाव्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला. इतर वास्तव भाजप कार्यकर्ते यांनी या मेळाव्यात उपस्थित राहू नये, असे आवाहन केले. त्यात यापूर्वी कोणत्याही कार्यक्रमात साधी दखल घेतली जात नाही, पण ऐन निवडणूक काळात होणाऱ्या मेळाव्याच्या पत्रिकेत माजी आमदार कै. दगडू पा.बडे यांचे चिरंजीव सरपंच धनंजय बडे व नवाब शेख यांची कोणतीही सहमती नसताना नावे टाकण्यात आल्याने ही बाब त्यांच्याही चांगली जिव्हारी लागली आहे. पत्रकार परिषद घेऊन केलेल्या विरोधामुळे आता शेवगाव-पाथर्डी तालुक्यातून आमदार मोनिकाताई राजळे यांना मोठा विरोध होते आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाच्या नावाखाली कार्यकर्ते यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जाते. भाजप पक्ष नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे वास्तव भाजप कार्यकर्ते यांच्यात संभ्रम निर्माण करीत आहेत. स्थानिक व लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार केला, त्यांनीच हा मेळावा घेतला. ते पक्षाचे सदस्य नाहीत. ते भाजपचे निष्ठावंत कसे ? असाही यावेळी सवाल उपस्थित केला आहे. यामुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यात वास्तव आणि अवास्तव भाजपावाल्यांमध्ये चांगलीचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला वास्तव भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments