Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केदारेश्वरच्या चालू गळीत हंगाम यशस्वीपणे हाती घेण्यासाठी सहकार्य करावे – प्रतापराव ढाकणे


नगर रिपोर्टर
पाथर्डी - केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम यशस्वीपाने हाती घेण्यासाठी ऊस उत्पादक सभासद तोडणी वाहतूकदार व कामगार यांनी सहकार्य करावे असे अहावन अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी व्यक्त केले.
    केदारेश्वर सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगाम यशस्वीपणे हाती घेण्यासाठी मुख्य मशिनरी असलेल्या मिलरोलरची अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कामास प्रारंभ केला आहे   
  यावेळी बोलताना श्री ढाकणे म्हणाले ऊस उत्पादक,सभासद कामगारांच्या हितासाठी अत्यंत अडचण असूनही मोठ्या हिमतीने हा कारखाना सुरु करण्याचा संचालक मंडळानी निर्णय घेतला आहे गत हंगाम व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर सन २०१९-२० हा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने हाती घेण्यासाठी आज यंत्रणा सुरु झाली आहे तोडणी कामगार भरती व वहातुकीसाठी वाहन करार सुरु करून मशिनरी दुरुस्तीसाठी प्रारंभ केला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा संकटात आहे आलेल्या संकटाशी सामना करून गळीत हंगाम यशस्वीपणे करण्यासाठी सहकार्य करावे असे अहावन श्री ढाकणे यांनी केले 
   यावेळी व्यवस्थापक अश्विनकुमार घोळवे, तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, जेष्ठ संचालक भाऊसाहेब मुंडे, बापूराव घोडके, त्रिंबक चेमटे, बाळासाहेब फुंदे, विठ्ठल अभंग, बटूळे महाराज, बाळासाहेब सिरसाट, प्रदीप देशमुख, बाबा गरड, चरसिंग परदेशी, मुख्य अभियंता भाऊसाहेब बर्डे, अकौंटंटन तीर्थराज घुंगरड, शेतकी विभागाचे अभिमन्यू विखे, शरद सोनवणे, पोपट केदार यांच्यासह सभासद सर्व विभागाचे अधिकारी कामगार मोठ्या संखेने उपस्थित होते 


केदारेश्वर साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम हाती घेण्यासाठी मिलरोलरचे पूजन करताना अध्यक्ष प्रतापराव ढाकणे समवेत तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे,संचालक भाऊसाहेब मुंडे, बापूराव घोडके, त्रिंबक चेमटे, बाळासाहेब फुंदे आदि दिसत आहेत छाया- बाळासाहेब खेडकर

Post a Comment

0 Comments