Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर छावणी परिषद शाळेत चित्र प्रदर्शन उत्साहातनगर रिपोर्टर
शनिवार दि.७ सप्टेंबर
   अहमदनगर -  म . गांधी यांच्या १५० वी जयंती निमित्ताने २०२० पर्यंत अहमदनगर छावणी  परिषदेने महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याची  विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, यासाठी अहमदनगर छावणी परिषद शाळेत विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

   डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत महात्मा गांधी यांच्या  जीवन कार्यावर आधारित विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन कला शिक्षक अरविंद कुडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
   छावणी परिषदेच्या आरोग्य समिती च्या  अध्यक्षा शुभांगी साठे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  कैलास मोहिते  व विनय महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी  मुख्याध्यापिका आशालता बेरड, म .गांधी उर्दू शाळेचे मुख्या खान खैरमोहमद , ज्येष्ठ शिक्षक गुलमहमद शेख , शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुभाष भारुड यांनी केले. पाहुण्यांचे आभार कला शिक्षक अरविंद कुडिया यांनी मानले .

Post a Comment

0 Comments