Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीरामपूर येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई ;२० लाखाचा दारु साठा जप्तदेवळाली प्रवरा येथे राज्य उत्पादन शुल्क 
भरारी पथक क्रमांक २ श्रीरामपूराची धडक कारवाई
नगर रिपोर्टर
श्रीरामपूर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , उपायुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर, उपाधिक्षक सी पी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजण्याच्या  सुमारास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ श्रीरामपूर व कर्मचाऱ्यांच्या मदतीने  सापळा रचून शिर्डी - राहुरी महामार्गालगत भारत पेट्रोल पंपच्या समोर देवळाली प्रवरा देवळाली प्रवरा (ता. राहुरी जि. अहमदनगर) याठिकाणी मिळालेल्या माहीतीनुसार  छापा मारला असता आरोपी आरोपी इसम नामे रिजवान खालीद इनामदार (रा. कोकणगाव ता. संगमनेर) व समीर सांडू शेख (रा. माजिदनगर ता.संगमनेर) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून मॅकडॉल व्हिस्की नंबर १ विदेशी मद्याचे बनावट ३७५ मिली व ७५० मिली असे एकूण ४५ विदेशी मद्याचे बॉक्स चोरून वाहतूक करताना महिंद्रा पिकअप वाहन (क्र. एम एच ०९ बीसी ४६५३) व मारुती सुझुकी इर्टिगा कार (क्र. एम एच १४ इसी ४८४५) असा एकूण १९ लाख ५२ हजार ५६० रुपये अंदाजे किमतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर आरोपी बरोबर इतर एक अज्ञात इसम पसार झाला त्या फरार घोषित करून सदर आरोपीं विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ ई ड ८०, ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना राहुरी न्यायालयात पोलिस कस्टडी मिळणे कामी हजर केले.
 कारवाई ही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ श्रीरामपूरचे सुरज कुसळे,  प्रभारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २, पी. बी. अहिरराव, दुय्यम निरीक्षक, के. यु. छत्रे तसेच कोपरगाव विभागाचे निरीक्षक बी.टी. घोरतळे, ए. व्ही. पाटील, भरारी पथक. १, व अहमदनगर विभागाचे निरीक्षक ए. बी. बनकर व दारुबंदी विभागाचे कर्मचारी  राजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे, निहाल उके, महिला संगीता जाधव, वर्षा जाधव यांनी कारवाई केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर  दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क क्रमांक २ पी.बी.अहिरराव हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments