Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात


आँनलाईन न्यूज नेटवर्क, व्हिडीओ
नगर रिपोर्टर
  अहमदनगरगणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणाबाजी करत नगर शहरासह जिल्हयामध्ये गणरायाला निरोप देण्यात आला. नगरातून  12 मंडळांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. मानाच्या श्री विशाल गणपतीची पूजा करण्यात आली.  मिरवणुकीत सर्व मंडळांनी  सहभाग घेतला. यंदाच्या मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्यांना महत्त्व देण्यात आले. ढोल, ताशांचे पथक यावेळी मोठ्याप्रमाणावर दिसून आले.  काही मंडळांनी डीजे लावले होते. नगर शहरासह जिल्हयात सर्वत्र मिरवणूक शांततेत पार पडली. यावेळी मोठा असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

  विसर्जन मिरवणुकीत मानाच्या विशाल गणेशापाठोपाठ महालक्ष्मी, कपिलेश्वर, दोस्ती, आदीनाथ, आनंद, नवरत्न, समझोता, निलकमल, शिवशंकर, माळीवाडा व नवजवान तरुण मंडळ अशा मानाच्या मंडळांचा समावेश करण्यात आला होता., तसेच शिवसेनेच्या वतीने मिरवणुकीमध्ये मंडळाचा सहभाग होता.
 सावेडी उपनगरामध्ये स्वतंत्र मिरवणुक काढून विसर्जन मिरवणूक पार पडली. अनेक ठिकाणी घरगुती गणपतींचे सुध्दा विसर्जन करण्यात आले.
नगर शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसापासून प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पुर्ण झाली होती. 

  श्रीविशाल गणेश मंदिर येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ‘श्रीं’ च्या मूर्तीची उत्थापन पूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरक, विजय कोथींबीरे, बाबासाहेब खरपुडे आदीसह विश्वस्त तसेच देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज आदी उपस्थित होते. मानाच्या गणपतीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ढोल पथक सहभागी झाले हेाते. मंदीराचे पुजारी संगमनाथ महाराज यांनी विधीवत पुजन करुन रथामध्ये मानाच्या गणपतीची पुजा करुन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. माळीवाडा, धरतीचौक येथे मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकांनी सडा, रांगोेळी ,काढून मानाच्या गणपतीची पूजा करण्यात आली.  पारशाखुंड, रामचंद्र खुंट येथे सुध्दा मानपाच्या गणपतीची पुजा व आरती प्रत्येक चौकाचौकात करण्यात आली. रामचंद्र खुटापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. मानाच्या गणपतीपुढे  अग्रभागी नगार्‍याची बैलगाडी, सावता माळी महिला मंडळाचा दांडिया, रिदम ढोल पथक, बुर्‍हाणनगर येथील शिवकृपा पथक, हलगी पथक, लेझिम पथक, झांज पथक  होते. 
मिरवणूक दाळमंडईत आल्यावर  या ठिकाणी डाळमंडाई मित्र मंडळाच्यावतीने मानाच्या गणपतीची पुजा करण्यात आली. त्यानंतर तेलीखुंट चौक, घासगल्ली चौक, भिंगारवाला चौक येथे मानाच्या गणपतीची पुजा आदर्श व्यापारी मित्र मंडळाच्या वतनी करण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक संजय चोपडा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर अर्बन बँक चौकरामध्ये अर्बंनच्या वतीने तर नवीपेठ कॉर्नर येथे शहर बँकेच्या वतनीे मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यात आले. नेता सुभाष चौकात मानाचा गणपती आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाअधिकारी विक्रम राठोड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, आदीसह़ नगरसेवक गणेश कवडे, संजय शेंडगे, अप्पा नळकांडे, गणेश शेंडगे, अमोल येवले, सुभाष लोंढे, दिपक खैरे, पदाधिकारी यावळी उपस्थित होते.  यानंतर पुढील चौकात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती झाली.
 नेतासुभाष चौकानंतर चौपाटी कारंजा येथे नगर मर्चंट बँकेच्यावतीने मानाच्या गणपतीची पूजा केली. त्यानंतर विश्वहिंदू परिषदेच्या वतीने पूजा झाल्या नंतर ५.५६  वा. मानाचा विशाल गणपती  दिल्ली गेट बाहेर पडला.

Post a Comment

0 Comments