Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नेवासा येथे तिहेरी तलाकचा जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखलनगर रिपोर्टर
नेवासा – नेवासा पोलिस ठाण्यात जिल्ह्यात तिहेरी तलाक (मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा) संसदेत मंजूर झाल्यानंतर त्यातील तरतुदीनुसार  गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा या नवीन कायद्यान्वये दाखल झालेला आहे.
सुमैय्या शाहिद पिंजारी रा.नाईकवाडी मोहल्ला नेवासा खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे लग्न २६ ऑगस्ट २०१३ रोजी शाहिद आयुब पिंजारी (रा.शिंगणापूर रेल्वे स्टेशन ता. कोपरगाव) याचे बरोबर झाले होते. लग्नात संसार उपयोग वस्तू देऊन मुस्लिम धर्म रितिरिवाजप्रमाणे झाले असून, सुरवातीस सासरकडील पती शाहिद आयुब पिंजारी, सासू सुलताना आयुब पिंजारी, सासरे आयुब दादामिया पिंजारी यांनी मला चांगले नांदविले. परंतु त्यानंतर त्यांनी नवीन घर बांधण्यासाठी मला माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले. आई -वडील गरीब असल्याचे त्यांना सांगितल्याने त्याचा त्यांना राग येऊन त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तुझ्या आई वडिलांकडून पैसे आण, असा दम देत घराबाहेर काढले. सदर घटना मी माझ्या माहेरच्या लोकांना संगितली. त्यानंतर मी माझे माहेरी नेवासा येथे राहिले.
त्यानंतर माझे वडील व नातेवाईकांनी सासरच्या लोकांकडे जाऊन मुलीला नांदवा, असे समजावून सांगत आमच्याकडे पैसे आल्यावर देऊ असे सांगितले. मला सासरी नांदायला सोडून सर्व जण नेवासा येथे निघून गेले. त्यानंतर एक ते दीड महिन्याने माझ्या नणंद हिना शाफिक पिंजारी (रा.वाळुंज. जि. औरंगाबाद) व अफसना नवाज पिंजारी (रा. नेवासा खुर्द) यांनी माझ्या सासरी आल्यानंतर सासू, सासरे यांचे कान भरून माहेरून पैसे आणत नाही, तोपर्यंत मला नांदवू नका, असे संगितल्याने सासरच्या मंडळींनी माझा पुन्हा शिवीगाळ करत शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून मी पुन्हा माहेरी नेवासा येथे निघून आले.
त्यानंतर नेवासा न्यायालयात मी सासरकडील लोकांविरुद्ध पोडगी मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची तारीख ३१ ऑगस्ट रोजी तारीख असल्याने मी व माझे आई वडील न्यायालयात हजर होतो. तारीख झाल्यानंतर नेवासा बसस्थानकाशेजारी असलेल्या दुकानावर आले. दुपारी अडीचच्या सुमारास पती शाहिद तेथे येऊन पोटगी अर्ज मागे का घेत नाही, असे विचारले. वडिलांनी त्यांना सांगितले की, सुमैय्याला नांदायला घेऊन जा. अर्ज मागे घेतो. असे म्हणताच त्यांना राग आल्याने माझ्या आई, वडिलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत मला तीन वेळेस तलाक म्हणून बेकायदेशीररित्या तलाक दिला आहे.
याप्रकरणी शाहिद आयुब पिंजारी, सुलताना आयुब पिंजारी, आयुब दादामिया पिंजारी (रा.शिंगणापूर रेल्वे स्टेशन ता.कोपरगाव), हिना शाफिक पिंजारी (रा.वाळुंज. जि. औरंगाबाद) व अफसना नवाज पिंजारी (रा.नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा २०१९ चे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments