Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात एलसीबीची धडकेबाज कारवाई ; दरोड्यातील ३ आरोपी अटक, वाळू उपशावरील बोटी उध्वस्तआँनलाईन न्यूज नेटवर्क
क्राईम न्यूज /नगर रिपोर्टर
अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील दरोड्यातील दोघांना राहाता तालुक्यात तर एकास औरंगाबाद जिल्ह्यात एलसीबी पथकाने पकडले. राहात्यात राहुल अशोक खरात (वय २२ रा. पिंपळवाडी रोड, अहिल्याबाई नगर, शिर्डी), किरण अर्जुन आरणे ( वय २२, रा.अब्दालशाहनगर, सिल्लोड, जि.औरंगाबाद) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एलसीबीचे पो.नि. दिलीप पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार राहाता तालुक्यातून पो.नि पवार यांच्या सूचनेनुसार फरार आरोपी राहुल खरात, किरण आरणे या दोघांना पकडण्यात आले, तर तिसरा आरोपी शेख इमरान याचा शोध घेऊन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे पकडण्यात आले.
एलसीबीचे स. पो.नि. संदीप पाटील, पोहेकाँ मनोज गोसावी, दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, पो.ना. रविंद्र कर्डिले, आण्णा पवार, संतोष लोंढे, राहुल सोळुंके, विशाल दळवी, संदीप दरंदले, सचिन कोळेकर, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, विजय ठोंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
----😢😢😢😢---
वाळू उपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी उध्वस्त ; महसूल व एलसीबी पथकाची कारवाई
श्रीगोंदा - अवैध वाळू उपसा व चोरी विरोधात धडक कारवाई मध्ये भिमानदी पात्रातील पाण्यातील वाळू उपसा करणाऱ्या १० लाख रुपयांच्या दोन यांत्रिक बोटी जिलेटीन च्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या.
जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार पो.ना.रवींद्र कर्डीले, रोहित मिसाळ, बाळू पालवे, विश्वास बेरड, कमलेश पाथरुट, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे आणि तहसीलदार महेंद्र माळी-महाजन यांच्या महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments