Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावेत; जिल्हा प्रशासनाचे आवाहनप्रवरा, गोदावरी, भिमा, घोडा, कुकडी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता

नगर रिपोर्टर
सोमवार दि.९
अहमदनगर - जिल्ह्यातील प्रवरा गोदावरी, भिमा, घोडा व कुकडी या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावेत, असे आव्हान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी केले आहे.

नदी ओढे व नाल्या काठाच्या नागरिकांनी दक्ष राहावे पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदी पात्रापासून व ओढे, नाल्यापासून दूर राहावेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावेत. धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. नदी प्रवाहामध्ये उतरू नये अचानक नदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे धोकादायक ठिकाणी चढू किंवा उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यांंशी संपर्क साधवा. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर टोल फ्री १०७७, (०२४१) २३२३८४४, २३५६९४० या नंबर वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments