Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात पोलिसांकडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरात वाहतूक कोडी  होऊ व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी शहराची नाकाबंदी केली आहे. २ ते १२ या दहा दिवसांच्या काळात शहरात काही रस्त्यांवर चारचाकी तर काही रस्त्यावर सगळ्याच वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. देखावे पाहण्यासाठी येणार्‍या नगरकरांना वाहने पार्क करण्याची ठिकाणंही पोलिसांनी ठरवून दिली आहेत.
फोर व्हीलर नो एंट्री
गांधी मैदान ते चितळे रोड, चौपाटी कारंजा ते चितळे रोड, माणिक चौक ते भिंगारवाला चौक, अर्बन बँक ते भिंगारवाला चौक, गंजबाजार कॉर्नर ते भिंगारवाला चौक (पारशा खुंट मार्गे येणारे वाहनांकरीता), चॉद सुलताना हायस्कुल ते मराठा मंदिर दुकानाकडे येणारा रस्ता (डांगे गल्ली), शनि चौक ते तख्ती दरवाजा मश्चिदकडे येणारा रोड
पार्किंग ठिकाणे
रंगभवनासमोर सर्जेपुरा, दिल्लीगेट पटांगण, गाडगीळ पटांगण (सातपुते तालीम), बंगाल चौकीजवळ, बापूशाह दर्गाजवळ (कोठला झोपडपट्टी), गैयबीपीर पटांगण झेंडीगेट, गांधी मैदान, बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलजवळ, सिध्दीबाग जलविहारजवळ, क्लेरा ब्रूस हायस्कुल ग्राऊंड स्टेशन रोड, फिरोदिया हायस्कुल ग्राऊंड (जुनी महापालिकेमागे), रेसिडेन्शीअल हायस्कुल व ज्युनियर कॉलेज.

Post a Comment

0 Comments