Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरातील गणपती मिरवणूक मार्गावरील छते पोलिस घेणार ताब्‍यात
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर शहरात 12 सप्‍टेंबरला गणेश विजर्सन मिरवणूक निघणार आहे. या दरम्यान   शांततेचा कोणताही भंग न होऊ देण्‍यासाठी कोणतीही ईमारत किंवा जागा तात्‍पुरती बंद करता येईल किंवा आपल्‍या ताब्‍यात घेता येईल.  पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना महाराष्‍ट्र पोलीस अधिनियमन 1951 चे कलम 39 अन्‍वये प्राप्‍त झालेल्‍या अधिकाराचा वापर करुन दि. 12 सप्‍टेंबरला गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावरील छत्‍ते  पोलीस प्रशासन ताब्यात घेेणार आहेे.
अहमदनगर शहरातील श्री गणेश विसर्जन मार्गावरील  कापड बाजार बाबुशेठ बोरा, शहाजी चौक, नितू ड्रेस, शंतीलाल चोपडा, कापड बाजार मोची गल्‍ली कार्नर श्री शाम देडगावकर, साफल्‍य इमारत पाटेगल्‍ली कार्नर, डॉ.कुलकर्णी यांची इमारत, नवीपेठ मनपा दवाखाना श्री कन्‍हैय्यालाल चंगेडिया, नवीपेठ इचरजबाई फिरोदिया शाळेची इमारत, खामकर चौक लोढा हाईटस, खामकर चौक राम मंदिर, छाया टॉकिज बडवे हॉस्‍पीटल, डी चंद्रकात टेलर्स, संतोष गुगळे याची इमारत रंगारगल्‍लीकडे जाणारे रोडवर, डॉ. सुंदर गोरे हॉस्‍पीटल, चौपाटी कारंजा, दिपाली एक्‍झीबीटर बिर्ल्‍डींग , बेलदार गल्‍ली कॉर्नर, सुरतवाला बिर्ल्‍डींग तेलीखुंट, श्री संतोष गुगळे यांची इमारत खामकर चौक, सुनहरी मस्जिद अल्‍पना बेकरीचे वर चितळे रेाड, उल्‍हास टेलर्स राजू ढोरे यांची इमारत नेता सुभाष चौक, देशबंद हॉटेल्‍स श्रीमती गोंगे यांची इमारत चितळे रोड, दिपक आईल डेपो श्री दिपक परदेशी, श्री गणेश अष्‍टेकर ,कागद कुट्टा मस्जिद ट्रस्‍टी शेख चॉंद भाई, पटेल मेडिकल श्री पटेल, तांबे मेडिकल श्री सुभाष पाठक, दत्‍त मदिर ट्रस्‍ट श्री कोपरगावकर यांची इमारत चौपाटी कारजा, दिल्‍लीगेट वेस, या इमारतीचे छते (गच्‍ची) दि. 12 सप्‍टेंबरला  सकाळी 8 वाजेपासून दि. 13 सप्‍टेबर  रोजी सकाळी 8 वाजेपर्यत तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात पोलिस प्रशासन ताब्यात घेेणार  आहे, असे पो‍लीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments