Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्रकारांमुळे तपासाला दिशा मिळते - दिलीप पवारअ.भा.ग्रामीण पत्रकारांना ओळखपत्राचे वितरण
नगर रिपोर्टर
अहमदनगर -पत्रकार हा प्रशासनाचा तिसरा डोळा असून पत्रकारामुळे काही घटनेत तपासाला दिशा मिळते.असे प्रतिपादन अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वाटप पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, बाबा ढाकणे,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जाधव उपस्थित होते.संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचा सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश महिला मंच उपाध्यक्षा सौ.मिनाताई सुभाष राहींज, उत्तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मारूती  कदम,राहुरी तालुका अध्यक्ष दिपक दातीर, सरचिटणीस नारायण चोरमले यांना संघटनेचे नियुक्ती पत्र व ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस शंकर मरकड, दक्षिण कार्याध्यक्ष दिपक खोसे,शेवगांव तालुका कार्याध्यक्ष सलीम शेख, इलेक्ट्रॉनिक मिडीया सरचिटणीस सुनील रणमले, सुभाष राहींज,रविंद्र कर्डीले आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र सरकारने पत्रकारांमध्ये भेदभाव न करता सर्व पत्रकारांची नोंद शासन दप्तरी करुन अधिस्वीकृत म्हणून घोषित करावे.व प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पत्रकार भवन मंजूर करावे. पत्रकार संरक्षण कायदा आमलात आणावा.अन्यथा अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने,प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारले जाईल.
सौ.मिनाताई सुभाष राहींज
महिला मंच प्रदेश उपाध्यक्षा
अ. भा.ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र प्रदेश
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ अहमदनगर जिल्हा पदाधिकाऱ्यांना संघटनेचे ओळखपत्र वाटप करताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव ( छाया - गणेश शिंदे )

Post a Comment

0 Comments