Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी-शेवगांवच्या सर्वांगिण विकासाचा घेतलेला हा वसा असाच अविरतपणे सुरू राहिल! - ढाकणे


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी -पाथर्डी-शेवगांवच्या सर्वांगिण विकासाचा घेतलेला हा वसा असाच अविरतपणे सुरू राहिल!
 समाजातल्या प्रत्येक घटकाला मुळ प्रवाहात आणून सुशिक्षीत करण्यासाठी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी नेहमीच प्रयत्न केला. त्याच्यांच या पावलावर पाऊल ठेवत सध्या आम्ही काम करत आहोत, असे प्रतिपादन अँड प्रताप ढाकणे यांनी केले.
खरंवडी कासार येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खाली उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. 
ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेची शाळा सुरू व्हावी यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रभावती ढाकणे यांनी पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. मात्र काही तांत्रिक कामकाजाच्या अडचणीमुळे शाळेचे काम सुरू करण्यास वेळ लागणार होता.
जिल्हा परिषदेचे हे विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. उद्याचा सक्षम भारत घडवण्यासाठी या विद्यार्थ्याचे योगदान राहणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मी पुढाकार घेऊन स्वखर्चातून तात्पुरत्या स्वरूपाच्या वर्ग खोल्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्याची शिक्षणाची गैरसोय दुर झाली आहे. यांचा मला मनस्वी आनंद होत आहे, असे म्हणाले.
यावेळी गावातील नागरिक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments