Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्योदयाची व्याख्या नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत - सुनील देवधरपंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचा प्रचंड प्रतिसादात समारोप
नगर रिपोर्टर
   अहमदनगर - नवीन भारताच्या निर्मितीसाठी देशात परिवर्तन होणे आवश्यक होते.पंचवीस वर्षेचाललेली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची माणिक सरकारची सत्ता गेल्या तीन मार्चला भारतीय जनता पार्टीने उलथवून लावली. हे सहजासहजी शक्य झाले नाही. गेल्या अनेक वर्षापासून मार्क्सवादी गुंडांकडून संघाच्या व भाजपच्या असंख्य पदाधिकार्‍यांची व  कार्यकर्त्यांची हत्या केल्या गेल्या. अनेक वर्षाच्या लढ्यानंतर आता तेथील वातावरण बदलले आहे. कोणत्याही हिंसेचा आधार न घेता त्रिपुरामधील लाल निशाण आता हटले आहे. तेथे आता भारतीय मजदूर संघाचे भगवे निशान अभिमानाने फडकत आहे. 2014 सली नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर अध्यात्म, हिंदुत्वाच्या विचारावर काम सुरू करून देशाच्या विकासात सुरुवात केली. त्यामुळे हिंदुत्व आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सर्वेपी सुखिनः सन्तु.., दुरितांचे तिमिर जावो...., सबका साथ सबका विकास या तत्त्वावर काम करत आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्योदयची व्याख्या नरेंद्र मोदी पूर्ण करत शेवटच्या स्तरापर्यंत आज विकास पोहोचवत आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले.
      पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने व  दीनदयाळ व्याख्यानमाला संयोजन समिती आयोजित चौथ्या व्याख्यानमालेचा समारोप भाजपचे राष्ट्रीय सचिव व त्रिपुरा राज्याचे परिवर्तक म्हणून ओळखले जणारे  सुनील देवधर यांच्या ‘एकात्मता मानवता वादातून आधुनिक भारताकडे वाटचाल’ या विषयावर व जेष्ठ विचारवंत, पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘पुरोगामी झाले प्रतिगामी’ या विषय वरील व्याख्याने समारोप झाला. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, रा.स्व.संघाचे शहर संघचालक शांतीराम चंदे, पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, उपाध्यक्ष गौतम दीक्षित, मानद सचिव विकास पाथरकर, व्याख्यानमाला समितीप्रमुख धनंजय तागडे, कार्याध्यक्ष सुहास मुळे व संचालकांसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक माऊली सभागृहात उपस्थित होते. तीन दिवस चालेलेल्या या व्याख्यानमालेस प्रचंड प्रतिसाद मिळाला.
          यावेळी सुनील देवधर पुढे म्हणले, नगर शहरात देशासाठी, समाजासाठी चिंतन होण्यासाठी एका व्याख्यानमालेचे आयोजन होत आहे आणि त्यास प्रचंड प्रतिसाद मिळतो हे पाहून मोठे अनुदान आनंद वाटत आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून चांगल्या वीचारांची देवाण-घेवाण होत आहे. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या उज्वला गॅस योजना, जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, अटल पेन्शन योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, डिजिटल इंडिया, मुद्रा योजना या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भारताच्या खेडोपाड्यात विकासाची गंगा गेली आहे. राजीव गांधी निर्लज्जपणे म्हणायचे मी वरून एक रुपये टाकतो तर खाली फक्त पंधरा पैसे पोहोचतात. म्हणजे केवढा मोठा भ्रष्टाचार काँग्रेस काळात होत होता असे तेच काबुल करतात. याउलट नरेंद्र मोदी यांनी योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात दिल्याने 100% मदत मिळाली. हा अंत्योदयाचा व हिंदुत्वाचा विकास आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेत न्यू इंडियासाठी झपाट्याने  प्रयत्न करत आहेत. यात नगरकरांचेही योगदान हवे आहे. यासाठी असे एक काम नियमित करा की ज्यातून दुसर्‍याला मदत होईल. नगरच्या विकासासाठी वसंत लोढा यांनी एखादा प्रकल्प देण्याची मागणी केली आहे. याबाबत दिल्लीत प्रस्ताव देण्याबरोबरच नगरचा एक कार्यकर्ता या नात्याने पाठपुरवठा करेल.
     विचारवंत भाऊ तोरसेकर म्हणाले,जो पुढच्या काळाकडे बघतो तो पुरोगामी असतो तर जो मागे बघत असतो तो प्रतिगामी असतो. काळानुसार बदलणे गरजेचे असते. मात्र पुरोगामी विचारवंत अजून मागेच बघत आहेत. गांधीवादी म्हणवणार्‍या नेत्यांना अजून गांधी कळलेले नाहीत. या उलट जनतेशी नाळ जुळलेले व गांधीजींच्या विचार धारेवर योजना आणून काम करणारे नरेंद्र मोदी खरे गांधीवादी नेते आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची 70 वर्षे गेली, मात्र म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही.2014 पूर्वी देशातील ग्रामीण भागाचा पोस्ट, रेल्वे खाते व सैनिक निवृत्त सैनिक यांची पेन्शन या तीन गोष्टी सोडल्या तर भारत सरकारच्या कोणत्याही कामाशी संबंध नसे. मात्र गेल्या पाच वर्षात भारत सरकार पहिल्यांदा ग्रामीण भागाशी जोडला जाऊन शेकडो योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवत आहे. हे बहुदा गांधीवाद्यांना दिसणार नाही, कारण सूर्य उगवून उपयोग नसतो तर आपले डोळे उघडे पाहिजे.
     यावेळी बोलतांना काका कोयटे म्हणाले, पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या नियोजनासाठी वसंत लोढा हे दिल्लीत किती धडपड करत असतात हे मी स्वतः अनुभवले आहे. ऋषीतुल्य व्यक्तींना भेटून या व्याख्यानमालेसाठी त्यांना पाचारण करत आहेत. ही दीनदयाळ पतसंस्था आमच्या राज्य पतसंस्था फेडरेशनचा अभिमान आहे. दीपस्तंभाप्रमाणे या संस्थेचे कामकाज होत आहे.
     प्रास्ताविकात वसंत लोढा यांनी या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी विविध क्षेत्रातिल नागरिकांनी बहुमोल योगदान लाभल्या बद्दल त्यांचे आभार मानून दीनदयाळ पतसंस्थेच्या पुढील काळात होणार्‍या मोबाईल बँकिंग, महिला सबलीकरणासाठी बचतगटांना अर्थपुरवठा या बाबत माहिते देत म्हणाले, नगरमध्ये जिल्हा प्रचारक असताना सुनील देवधर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभावीपणे काम करत माझ्यासारख्या असंख्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच आज मी सामाजिक क्षेत्रात उभा आहे. सुनील देवधर आता भाजपच्या राष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवरत्नांमध्ये त्यांचा सहभाग आहे. तुमचा आणि नगरचा जुना ऋणानुबंध आहे. नगर शहराच्या विकास खुंटला आहे. त्यास चालना मिळण्यासाठी एखादा मोठा प्रकल्प नगर शहरात द्यावा. त्यासाठी प्रयत्न करावेत हे माझे तुमच्याकडे हक्काने मागणे आहे.
          यावेळी पतसंस्थेचे संचालक सुधीर पगारिया, सोमनाथ देवळालीकर, सुभाष फणसे,नकुल चंदे, डॉ.ललिता देशपांडे, शैला चंगेडे, सुभाष फणसे,अनिल मोहिते, मंगेश डोंगरे, आर.डी.मंत्री, बाबसाहेब रणसिंग, किरण बनकर,  नरेंद्र श्रोत्री, निलेश लोढा, अनिल सबलोक आदिंसह व्याख्यानमाला संयोजन समितीचे कमलेश वैकर, अनिल आचार्य, संजय अकुबत्तीन, सिद्धार्थ दिक्षित, मकरंद घोडके, उमेश साठे, राजेंद्र नजन, राजू ढोरे, केशव काळे आदि उपस्थित होते. पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे, सुखदेव दरेकर व कर्मचार्‍यानी सहकार्य केले. शारदा होशिंग यांनी सूत्रसंचालन केले. तीन दिवस विविध क्षेत्रातील नागरिकांनी व श्रोत्यांनी व्याख्यानमालेस उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर यांनी आभारातून ऋण व्यक्त केले. संपूर्ण वंदे मातरम् ने व्याख्यानाची सांगता झाली.


Post a Comment

0 Comments