Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाळू उपसा करणार्‍या 70 लाख रुपये किंमतीच्या 19 बोटी उध्वस्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः  जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व चोरी विरुद्ध धडक कारवाई करून भिमा नदी पात्रातून वाळू उपसा करणार्‍या 70 लाख रुपये किंमतीच्या 19 यांत्रिक बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या आहेत.  महसूल विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
 याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत गार, राजापूर व माठ या गावांच्या शिवारातील भिमानदी पात्रातील पाण्यातून व घोड धरणाचे पाण्यातून काहीजण यांत्रिक बोटीच्या मदतीने चोरून वाळू उपसा करीत आहेत, अशी माहिती गोपनिय मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या सुचनेनुसार पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोना रविंद्र कर्डिले, सचिन आडबल, राहुल सोळुंके, रोहित मिसाळ, विशाल दळवी, रणजित जाधव, बाळू पालवे, शिवाजी ढाकणे, विश्वास बेरड, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, संदीप चव्हाण, मयूर गायकवाड, संभाजी कोतकर आदींसह श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी-महाजन यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. घटनास्थळी जाऊन खात्री केली असता,  यावेळी पोलिसांना पाहून सदरचे बोटी सोडून
पळून गेले. या ठिकाणी असणार्‍या 9 लोखंडी, 7 फायबर बोटी आणि तीन हायड्रा लोखंडी बोटी अशा एकूण 70 लाखा रुपयांच्या बोटी महासूल पथकाने जिलेटिन मदतीने स्फोट करून नष्ट केल्या.
 ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु व अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments