Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राजमार्ग क्रमांक 59 रुंदीकरण प्रस्तावास मंजुरी; तुळशीराम सानप यांच्या पाठपुराव्याला यश


नगर रिपोर्टर
 पाथर्डी - तालुक्यातील कुत्तरवाडी येथील तुळशीराम सानप या सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्यामुळे पाथर्डी ते नवगण राजुरी राजमार्ग क्रमांक 59 वरील अंतराच्या रुंदीकरण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे.

राज्यमार्ग क्रमांक 59 पाथर्डी ते नवगण राजुरी (ता.जि.बीड) असा आहे. या राज्यमार्गावर कारेगाव, करोडी, चिंचपुर इजदे, मानूर, शिरूर, नवगण, राजुरी अशी गावे येतात. उत्तरवाडी येथील तुळशीराम सानप यांनी 2018 मध्ये माजी.खा.दिलीप गांधी त्यांच्याकडे राज्यमार्ग रस्ता बाबत मागणी केली होती. त्यानुसार माजी खा गांधी यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार राज्यमार्ग क्रमांक 59, 54 रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. राज्यमार्ग क्रमांक 54 वरील अमरापूर (ता.शेवगाव) ते मिरजगाव (ता.कर्जत) तर राज्यमार्ग क्रमांक 54 वर माणिकदौंडी, धामणगाव, मिरजगाव अशी गावे येतात. राज्यमार्ग क्रमांक 59, 54 या दोन मार्गाची रुंदी ते ३० फूट असून राज्यमार्ग क्रमांक 54 चे काम चालू आहे. राज्यमार्ग क्रमांक 59 चे काम चालू होणार आहे.

Post a Comment

0 Comments