आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु।। येथील सोमैयानगरमध्ये दोन गटांमध्ये मारामारी झाली. या घटनेत कुर्हाडी व दांडक्याचा वापर केल्याने दोन्ही गटांचे अनेकजण जखमी झाले आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातील 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
समजलेली माहिती अशी की, फिर्यादी वैशाली विजय भोसले ( रा. सोमैयानगर, सावळीविहीर बु।।) हिने सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, रस्त्यावर काट्या टाकण्याच्या कारणावरून व मागील भांडणाच्या कारणावरून आरोपी शाहरूख मलंग सय्यद, सौरभ विलास लिहिणार, राजेंद्र सुखदेव म्हस्के, अजय राजेंद्र म्हस्के, राहुल राजेंद्र म्हस्के, राहुल महिपत लिहिणार, विलास नाथा लिहिणार (रा. सर्व सोमैयानगर) यांनी शिवीगाळ, दमदाटी,जीवे ठार मारण्याची धमकी देऊन काठ्या, कुर्हाडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या फिर्यादी वरुन त्याच्याविरोधात भादंवि 326, 323, 504, 506 रासे. कलम 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसर्या गटाकडून फिर्यादी राजेंद्र सुखदेव म्हस्के याने आरोपी विजय सर्जेराव भोसले, गौरव विजय भोसले, वैशाली विजय भोसले, कांतिलाल भोसले, सुप्रिया भोसले, सिंधू भोसले यांच्याविरोधात गुरनं 898/19 भा.दं.विधान 326, 323, 504, 506 ,राईट सेक्शन कलम.143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. रावसाहेब शिंदे हे करीत आहेत.
0 Comments