Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अबकी बार २२० पार’ अशी घोषणा केली आहे. हे यश भाजप मिळवणारच - ना.विखे
जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार; राधाकृष्ण विखेंचा दावा

नगर रिपोर्टर
अहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासकामांचा वेग वाढविला  आहे. सर्व योजना थेट जनतेपर्यंत जात असल्याने प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. ‘अबकी बार २२० पार’ अशी घोषणा केली आहे. हे यश भाजप मिळवणारच आहे. जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार आहे, असा विश्वास ना.  राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजानादेश यात्रा २४ व २५ ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यात येणार आहे. २४ ऑगस्ट रोजी शहरात जाहीर सभा होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी मंत्री विखे यांच्या उपस्थितीत शहरात भाजपाची बैठक पार पडली. यावेळी खासदार सुजय विखे, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, उपमहापौर मालन ढोणे, सुनील रामदासी, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, नितीन शेलार, शाम पिंपळे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले की, महाजानादेश यात्रा दोन दिवस नगर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात होणार्‍या सर्व सभा भव्यच  होणार आहेत. नगर शहरातही सभा होणार आहे. पालकमंत्री राम शिंदे, मी व दिलीप गांधी यासाठी नियोजन करत आहोत. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची पायाभरणी या महाजानादेश यात्रेच्या माध्यमातून होणार आहे.
दिलीप गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत देशात भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या विकासाकामंचा लेखाजोखा मांडण्यासाठी महाजादेश यात्रा संपूर्ण राज्यात जात आहे. नगरमध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत होणार आहे.
प्रारंभी शहर भाजपच्या बैठकीत प्रथमच उपस्थित असलेले मंत्री राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे यांचा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्कार केला. सुनील रामदासी यांनी प्रास्ताविक केले. गौतम दिक्षित यांनी सूत्रसंचालन केले. सुवेंद्र गांधी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments