Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर वंचित बहुजन आघाडी व एमआयएम, भारिपच्यावतीने रस्तारोको आंदोलन


नगर रिपोर्टर
बुधवार दि.२८
बोधेगाव - पैठण-पंढरपूर मार्गावारील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे धनगरांना आरक्षण देण्यात यावे बोधेगाव येथील आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, आदी प्रमुख मागण्यांंसाठी शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर बुधवारी वंचित बहूजन आघाडी व एमआयएम, भारिप यांच्या वतीने माजी जिप सदस्य प्रकाश भोसले यांच्या नेतृत्वाखाली  रस्ता रोको आंदोलन झाले. नायब तहसिलदार श्रीमती माळी यांनी आश्वासन दिल्यानंतर पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

        बोधेगाव येथे आज बुधवारी सकाळी शेवगाव गेवराई राज्यमार्गावर वंचित बहुजन आघाडी एम आय एम भारिप यांच्या  वतीने पैठण-पंढरपूर मार्गावारील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी भयावह  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून रब्बी हंगामाचा पीक विमा देण्यात यावा , प्रलंबित धनगरांना आरक्षण देण्यात यावे, बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्त करून आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, बोधेगाव येथे नवीन बसस्थान बांधण्यात यावे , मुस्लिम व अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार करणारावर कडक शासन करण्यात यावे जिप शाळेत पिण्याचे पाण्याची सोय करावी, विधानसभा निवडणूक  इ व्हि एम मशिन ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, बोधेगाव येथे आदी प्रमुख मागण्यासाठी शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर बुधवारी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने माजी जिप सदस्य प्रकाश भोसले यांच्या नेतृत्वाखाली  रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले यावेळी माजी जिप सदस्य प्रकाश भोसले, प्रथमेश सोनवणे, संतोष बानाईत, राजू वीर,  रावसाहेब निकाळजे, इस्माईल पटेल, बबन मिसाळ यांची भाषणे झाली. आंदोलनात फारूक सय्यद, अविनाश खंडागळे, अन्सर कुरेशी, विष्णू वीर, दिगंबर बल्लाळ, दत्तू कनगरे, सुनिल घोरपडे, संजय बल्लाळ, सुरेश तोटारे, संजय वाल्हेकर, नबाब शेख, नवनाथ मिसळ,अन्सार शेख,अनिस सय्यद, प्यारेलाल शेख, जमीर शेख, यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 नायब तहसिलदार शोभा माळी, पोलीस उपनिरीक्षक सुहास ठाकरे, यांनी आंदोलकांनी भेट घेऊन संबधीत प्रश्न मार्गी लागण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments