Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीगोद्यात साफसफाई कामगारांकडे मागितली खंडणी ; गुन्हा दाखलनगर रिपोर्टर
शुक्रवार दि.२३
श्रीगोंदा – श्रीगोंदा बसस्थानकातील महिला सफाई कामगारांकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एका पत्रकारासह अन्य एका अनोळखी इसमावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सफाई कामगार महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले  की, बुधवारी (दि. 21) सकाळी १०.३० ते ११.०० वाजण्याच्या कालावधीत पंचशीला सोनवणे व पूजा लोहिरे या दोघी महिला बसस्थानकात  सफाई काम करत होते. यावेळी दोन जण तेथे गेले. त्यांनी सफाई कामगार त्या महिलांंनी झाडल्यानंतर प्रवाशांकडून ठिकठिकाणी झालेला किरकोळ कचरा पायाने एकत्र केला. तो कचरा एकत्र करुन दोघे त्याची शुटींग करीत होते.  सफाई कामगार महिलांनी त्यांच्याकडे तुम्ही कोण आहात, अशी विचारणा करतात त्यांनी पत्रकार असल्याचे सांगितले. त्यांनी सफाई कामगारांना सुपरवायझरला फोन करून पैशाची मागणी करण्यास सांगितले. पैसे न दिल्यास शुटींग माझ्या न्यूज चॅनलवर प्रसारीत करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पंचशीला सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एका पत्रकारासह अन्य एकावर एका वर गुन्हा नोंदविण्यात आला. 

Post a Comment

0 Comments