Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर प्रा. आरोग्य केंद्राच्या डॉक्टराचा प्रताप कोऱ्या कागदावर केसपेपर!शिर्डी पोलीस ठाण्यात प्रा. आरोग्य केंद्र डॉक्टरविरोधात तक्रार दाखल

नगर रिपोर्टर
मंगळवार दि.२७
 सावळीविहीर -  राहाता तालुक्यातील सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टराने मोठी शक्कलच लढवली, रुग्णालयात रुग्णास सरकारी केसपेपर देण्याऐवजी कोऱ्या वहीच्या पानावर केसपेपर दिला. याबाबत एका न्यूज चँनल प्रतिनिधी विचारण्यास गेला असता त्यास अरेरावीची भाषा वापरली. या घटनेनंतर न्यूज चँनल प्रतिनिधी यांनी  संबंधित डॉक्टर विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा जिल्ह्यातील पत्रकारानी निषेध व्यक्त केला आहे.

सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात गैरकारभार चालू असून याठिकाणी कार्यरत डॉ. गागरेला भलतीच मस्ती आली असल्याचे दिसून येत आहे, याच्या मनमानी कारभाराला परीसरातील रुग्ण कमालीचे वैतागले असून याच्या अरेरावीने तर मुजोरीची परीसिमाच गाठली आहे, या केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना हा महाभाग साध्या कागदावर केसपेपर देत असून विचारणा केली असता माझं कोणी काही वाकडं करु शकत नाही असे बेताल वक्तव्य करत आहे.
हा घ्या सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचा केसपेपर

एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारास जेव्हा या महाभागांच्या गैरकृत्याची खबर मिळाली असता तो बातमी करण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला असता त्यालाही अपमानास्पद वागणूक देत हा महाभाग कॅमेरा फोडण्याची तथा गावातील काही गुंड प्रवृतीच्या लोकांकरवी हा त्या पत्रकारास तंगड्या तोडण्याची भाषा करु लागला, अशा या मुजोर आणि गैरकारभारी डॉक्टराविरुद्ध या पत्रकाराने शिर्डी येथील पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिर्डी पोलिस तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments