नगर रिपोर्टर
सोमवार दि.२६
पारनेर – पारनेर तालुक्यातील गुणोरे या गावातील एकाच कुटुंबातील चारजणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडली.
बाबाजी विठ्ठल बडे, पत्नी कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य बाबाजी बडे, धनंजय बाबाजी बडे (सर्व रा. बडेमळा, गुणोरे, ता. पारनेर) मयतांची नावे आहेत. यातील आदित्य बडे हा दिव्यांग असून, कविता बडे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.
सोमवारी सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. घटनेची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
0 Comments