नगर रिपोर्टर
मंगळवार दि.२७
शेवगाव - तालुक्यातील बोधेगाव येथे पैठण-पंढरपूर रस्त्यासाठी बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मोबदला देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी बोधेगाव येथे सोमवारी दहा वाजता राष्ट्रवादी काँगेस च्या वतीने सभापती डॉ क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनात राष्ट्रवादीचे कैलास नेमाने, संजय कोळगे, बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुर , सुधाकर तहकीक, राजेंद्र ढमढेरे, भाऊराव भोंगळे, एकनाथ कसाळ, मोहनराव देशमुख, किसन गलांडे, उपसभापती शिवाजी नेमाने, हनुमान पातकळ, अनिल घोरतळे, रोहित पारनेरे सुरेश दुसंगे, सर्जेराव दहिफळे, क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष गायकवाड, रॅम अंधारे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments