Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा रूग्णालयातील महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व शस्त्रक्रियासर्वसामान्यांच्या हक्कासाठी व चांगल्या आरोग्यासाठी शिवसेना कटिबध्द : अनिल राठोड
नगर रिपोर्टर
सोमवार दि.२६
अहमदनगर- वैद्यकीय सेवा महागडी होत असल्याने आजच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे गरजेचे बनले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिकवण लक्षात घेवून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यभरातील 16 जिल्ह्यांत महाआरोग्य शिबिरांचा उपक्रम राबविला आहे. यातून ग्रामीण, शहरी तसेच आदिवासी भागातील सर्वसामान्य रूग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळण्याबरोबरच त्यांच्यावरील शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. चांगले आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क असून नगर जिल्हा रूग्णालयात आयोजित या शिबिरातून अनेकांचे आयुष्य आरोग्यसंपन्न होईल. सर्वसामान्यांना त्यांचे हक्क व उत्तम आरोग्य मिळवून देण्यासाठी शिवसेना नेहमीच कटिबध्द असेल, अशी ग्वाही शिवसेना उपनेते माजी आ.अनिल राठोड यांनी दिली.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा रूग्णालय अहमदनगर यांच्यावतीने आयोजित मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे उदघाटन शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातून व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे करण्यात आले. त्यांच्यासमवेत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उद्घाटनप्रसंगी नगर जिल्हा रूग्णालयात शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर सुरेखा कदम, सभापती रामदास भोर, अनिल कराळे, शरद झोडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, संभाजी कदम, निलेश भाकरे, संजय लोंढे, सचिन शिंदे, अमोल येवले, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, दत्ता सप्रे, अरूणा गोयल, सुषमा पडोळे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम समन्वयक विजय दळवी यांनी प्रास्ताविकात शिबिराची माहिती दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मुरंबीकर म्हणाले की, राज्यातील 16 जिल्ह्यात एकाचवेळी हे महाआरोग्य शिबीर होत आहे. नगरमध्ये दि.26 ते 29 ऑगस्ट या कालावधीत शिबिर होत असून यात विशेष बाब म्हणजे खासगी प्रॅक्टिस करणारे तज्ज्ञ डॉक्टर याठिकाणी येवून रूग्ण तपासणी करीत आहेत. लहान मुलांवरील शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथून तज्ज्ञ सर्जनची सेवा या शिबिरात मिळत आहे. कॅन्सर, हृदयरोग, मानसोपचार, लहान मुलांचे आजार तसेच सर्वच आजारांशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टर शिबिरात रूग्णांची तपासणी करीत आहेत. आवश्यकतेनुसार रूग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही या शिबिरात केल्या जाणार आहेत. काही शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयात होणे शक्य नसल्यास त्या रूगांवरील शस्त्रक्रिया खासगी रूग्णालयात मोफत केल्या जाणार आहेत.  महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेतून रूग्णांवर खासगी रूग्णालयातील शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रामदास भोर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे आदींची भाषणे झाली. मुंबईतील वोकार्ड हॉस्पिटल येथील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ.रश्मी जियानी व डॉ.संजय काळे यांनीही या शिबिरात आवर्जून सहभाग घेतला आहे. याठिकाणी ते लहान मुलांची टू डी इको तपासणी मोफत करून आवश्यक बालकांवर मुंबईत वोकार्ड हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करणार आहेत. शिबिरात नगरमधील कॅन्सर तज्ज्ञ डॉ.सतीश सोनवणे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.वारे, फिजिशियन डॉ.अनिकेत कुर्‍हाडे, बालरोग सर्जन डॉ.हेमंत नाईक, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.स्नेहल भालसिंग, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.झालानी, त्वचारोग तज्ज्ञ डॉ.सूर्यवंशी, न्युरो फिजिशियन डॉ.सोमानी, न्युरो सर्जन डॉ.माजीद, पोटविकार तज्ज्ञ डॉ.पालवे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.तुपे, दंतरोग तज्ज्ञ डॉ.सोनवणे व जिल्हा रूग्णालयातील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली.
पहिल्याच दिवशी या शिबिरात दीड हजारांहून अधिक रूग्णांची नोंदणी झाली. प्रत्येक रूग्णाला योग्य प्रकारे आरोग्यसेवा मिळेल यासाठी जिल्हा रूग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉ.गणेश खेडकर, डॉ.हरुण शेख, डॉ.अरूण सोनवणे, डॉ.मनोज घुगे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अमोल शिंदे, गोरक्ष इंगोले, विजय दळवी, वंदना गायकवाड, शैला कोतकर, भक्ती पाखरे, संध्या रामगुडे, अविनाश कराळे, सतीश आहिरे, गणेश शिंदे, संजय पालवे, संतोष तिळवले, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments