Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणेशोत्सव व मोहरम सण शांतपणे साजरे व्हावेत व कायदा व्यवस्थेचा समस्या न येण्यासाठी नगरकरांनी सहकार्य करावेत - जिल्हाधिकारीनगर रिपोर्टर
मंगळवार दि.२०
अहमदनगर - यावर्षीही एकत्रित येणा-या गणेशोत्सव व मोहरम सण शांतपणे साजरे व्हावेत, व कायदा व्यवस्थेचा समस्या न येण्यासाठी नगरकरांनी सहकार्य करावेत, असे आवाहन मंगळवार (दि.२०) नियोजन भवनात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले
  शहरवासीय आणि जिल्हावासीय आनंदात, उत्साहात आणि कोणतेही गालबोट लागणार नाही, असाच साजरा करतील आणि राज्यासमोर शांततापूर्ण उत्सव साजरा करण्याचा नगर पॅटर्न ठेवतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. यावेळी विविध गणेश मंडळे व मोहरम उत्सव समित्यांनी आरास साधेपणाने करुन काटकसर करुन कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ईशु सिंधू, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, सहायक परिवहन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. विविध गणेश मंडळे, मोहरम उत्सव समित्यांचे अध्यक्ष-पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य  यावेळी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments