नगर रिपोर्टर
(बाबा ढाकणे)
शुक्रवार दि.२३
अहमदनगर - नामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून यूज आँन थ्रो होते आहे. हे नगर जिल्ह्यात येत असणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रा फलकातून ना.मुंडे यांच्या गायप झालेल्या फोटो वरून दिसून येत आहे. याच कारणास्तव भाजपातील ना.मुंडे यांना मानणारा गट नाराज झाला आहे. यामुळे याचा प्रभाव येत्या विधानसभेच्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार असे चित्र भाजपात दिसत आहे. ही नाराजी मुख्यमंत्री दूर करतील की, याला अजून खतपाणी घालतील हे दिसेलच!
जिल्ह्यात भाजपाची येणाऱ्या महाजनदेश यात्रा दरम्यान शेवगाव, जामखेड, संगमनेर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. परंतु या सभेदरम्यान अहमदनगर भारतीय जनता पार्टीने सोशल मीडिया व बॅनरबाजी मध्ये नामदार पंकजाताई मुंडे यांचा फोटो कुठेही दाखवण्यात आला नाही. परंतु प्रामुख्याने नामदार राधाकृष्ण विखे पा., खासदार सुजय विखे पा., पालकमंत्री राम शिंदे व पक्षाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदींचे फोटो दिसत आहेत. या घडामोडीमुळे ना मुंडे यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. मत मिळवण्यासाठीच फक्त नामदार पंकजाताई मुंडे यांच्या सभा घेतल्या जातात. नामदार मुंडे यांचा यूज ऑन थ्रो केला जात आहे. अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये उमटली आहे. त्यामुळे याच विषयावरून नामदार मुंडे यांचे समर्थक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. वास्तविक पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले, तरी नामदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे राज्याच्या नेत्या म्हणून पाहिले जाते, असे असताना नगर येथे येणाऱ्या भाजपाच्या महाजनदेश यात्रा बॅनर व सोशल मिडियातून प्रसिद्धीतून नामदार पंकजाताई मुंडे यांचा फोटो का नाही, असाही सवाल संतप्त ना.मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे यामुळे येत्या काळात याचा पक्षात कलह वाढणार असल्याचे दिसून येत आहे
0 Comments