Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी तयार केले ' अँँग्रोपोस्ट' नावाचे अँँप. विनामुल्य सेवा


    नगर रिपोर्टर
 आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे.परंपरेने चालत आलेला शेतीव्यवसाय अनेक लोक आजही करतात.पावसाचा लहरीपणा,ग्लोबल वॉर्मिंगमुळे सतत बदलणारे हवामान, शेतमालास योग्य भाव न मिळणे, या सारख्या अनेक समस्या आजच्या शेतीपुढे आहेत.त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि नियोजनाचा पुरेपूर वापर केल्यास शेतीव्यवसाय भविष्यात फायद्याचा ठरु शकतो. सध्याच्या या स्पर्धेच्या युगात शहरी भागासोबतच ग्रामिण भागातील युवकही समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.बहुसंख्य लोकांकडे स्मार्टफोन आहेत.याच अनुषंगाने शेवगाव तालुक्यातील खामपिंप्री चे शेतकरीपुत्र संगणक अभियंते श्री.अशोक मोडके व बोधेगावचे श्री.सुजीत केसभट यांनी त्यांच्या संकल्पनेतुन  'अॅग्रोपोस्ट' नावाचे नवीन अॅप तयार केले आहे .शेतकरी आणि शेतीसेवा देणार्‍यांना संस्था एकत्रीत आणून खरेदी विक्री आणि विविध सेवा देण्यासाठीचे सर्वोत्तम अॅप असल्याचे त्यांनी सांगीतलेआहे.विक्रेते आणि ग्राहक यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून हे अॅप कार्य करणार आहे
 ग्रामीण भागातील शेतकरी कष्टातून शेतमाल मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो.तो दिर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही.त्यामुळे शेती मालास किफायतशीर किंमत मिळाल्यास उत्तम प्रकारे नफा मिळतो.मात्र अद्यापही शेतमाल व संबधित सेवा मोठ्या प्रमाणात परंपरागत पद्धतीने विक्री केला जातो. त्यामुळे मिळणारी किंमत किफायतशीर मिळत नसल्याचे दिसून येते.

       याच अनुषंगाने शेतकरी व शेतकर्‍यांशी संबंधीत सर्व कृषी सेवा प्रदाते जसे की होलसेल, किरकोळ विक्रेते, कृषीतज्ज्ञ, पशुवैद्यकीय डॉक्टर, निर्यातक, उत्पादक, नर्सरी, बियाणे  पुरवठादार, वाहतुकदार, मशिन भाड्याने देणारे, कृषीसेवाकेंद्र व इ-सेवाकेंद्र इत्यादींना जोडण्यासाठी 'अॅग्रोपोस्ट' अॅप नविन तंत्रज्ञान व मंच प्रदान करीत आहे.
       शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री खरेदी नवीन तंत्रज्ञान व माहिती सर्व प्रकारच्या विक्रीचे विनामूल्य पोस्टिंग, शेतकरी ते ग्राहक यांच्यादरम्यान ऑनलाईन चॅटिंग व डायरेक्ट कॉलिंग, नोकरीविषयक जाहिराती हे आहेत 'अॅग्रोपोस्ट' अॅपची खास वैशिष्टे.सदर अॅप सध्या मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलगू या चार भारतीय भाषांमधे उपलब्ध आहे.

       शेतकर्‍यांना बाजारपेठेतील सर्वोत्तम किमतीत विक्री करण्यास मदत करण्याच्या सामाजिक हेतूने प्रेरित होऊन या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.अधिक श्रमाची व वेळेची बचत करण्यासाठी फक्त एक 'क्लिक' आवश्यक आहे. अन्नधान्य, फळे, भाज्या, फुले, दूध उत्पादने, मासे, चिकन,शेती व वाहतूक सेवा, औजारे, वाहने बियाणे, खते, कीटकनाशके, पशुधन, नोकरी
 इत्यादी शेती व शेतीसंबधात सर्व माहीती आणी देवाणघेवान या अॅप व्दारे विनामुल्य मिळणार आहे. जर प्रत्येकाने ठरवले की 'कृषीविकासाची कास धरू, अॅग्रोपोस्ट अॅप डाऊनलोड करू' तर नक्कीच शेतीसंबंधित खरेदीविक्री सेवा सुलभ होण्यास हातभार लागेल.  हे अॅप गुगल प्लेस्टोअरवरून कोणिही सहज व मोफत डाऊनलोड करु शकते.लवकरच या अॅपचे मार्केटिंग भारतभर विविध भाषांमधे करण्यात येणार आहे. वापरण्यास अत्यंत सोयिस्कर, वेळेची व श्रमाची बचत करणारे, घरबसल्या खरेदीविक्री सेवा उपलब्ध करून देणारे 'अॅग्रोपोस्ट' अॅप सर्व शेतकर्‍यांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन अशोक मोडके व सहकार्‍यांनी केले.     
                                        

Post a Comment

0 Comments