Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरच्या आयटी पार्कमध्ये एक हजार मुले काम करतील - आमदार जगतापनगर रिपोर्टर
सोमवार दि.२५
अहमदनगर -  बंद पडलेले आयटी पार्क सुरू करण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.  पुणे, मुंबई, हैद्राबाद, बेंगलोर याठिकाणीच्या  विविध कंपन्या बरोबर बोलणे झाले. सातत्याने तीन वर्ष प्रयत्न केल्यानंतर आज हे पहिले पाऊल टाकले आहे. 'फेज वन'चे काम सुरू झाले असून 300 ते 350 मुलांना रोजगार मिळाला आहे. हे काम येवढ्यावरच न थांबता जानेवारीपर्यंत नगरच्या आयटी पार्कमध्ये एक हजार मुले काम करतील, असा विश्‍वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
एमआयडीसी येथील आयटी पार्कमध्ये कंपन्यांचे उद्धघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्घाटन रिलायन्स होम फायन्सचे प्रशांत उत्रेजा यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अरुण जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, एस.के.सांगळे, अरविंद पारगावकर, अशोक सोनवणे, राजेंद्र काटरीया, गणेश वाघ, राजेश आठरे, रेश्मा आठरे, सुमीत लोढा आदी उपस्थित होते.
संग्राम जगताप म्हणाले की, नगर विषयी प्रत्येकाच्या मनात आपूलकी असली पाहिजे, नगरचे ऐतिहासिक शहर अशी ओळख आहे. ही ओळख कायम ठेऊन विकासाकडे वाटचाल करणारे नगर अशी ओळख निर्माण होत आहे. आयटी कंपन्या उभ्या होत आहेत. यामुळे नगरच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. भविष्यात नदी सुशोभीकरणातून नगरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रशांत उतरेजा म्हणाले की, देशातील महाराष्ट्र राज्य हे सर्वात जास्त रोजगार देणारे राज्य आहे. या राज्याची संस्कृती सर्वाना बरोबर घेऊन चालणारी संस्कृती आहे. इतर राज्यातील लोकांनी महाराष्ट्रात येऊन रोजगार मिळवला. सर्वाना महाराष्ट्र हे राज्य हवेहवेसे वाटणारे राज्य आहे. आ. संग्राम जगताप या युवकाच्या माध्यमातुन शहरामध्ये अनेक तरूणांना रोजगार मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments