Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरसेवक श्‍याम नळकांडे यांच्या पाठपुराव्याला यश ; पैठणकरांची अखेर बदलीनगर रिपोर्टर
अहमदनगर - तत्कालीन आयुक्त कथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निलंबित केलेले व एक महिन्यात पुन्हा त्याच पदावर विराजमान झालेले महापालिकेचे घनकचरा विभाग प्रमुख एन एस पैठणकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. पैठणकर यांनी आता घनकचरा विभाग प्रमुख म्हणून काम न पाहता आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांच्या हाताखाली काम करावे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सोमवारी काढले आहेत.नगरसेवक श्याम नळकांडे यांनी याबाबत पाठपुरावा
नगरसेवक श्याम नळकांडे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. प्रशासन यांच्यावर इतकी मेहरबानी का दाखवत आहे. त्यांना सेवेत पुन्हा नियुक्त करून नियमबाह्य पद्धतीने पुन्हा घनकचरा विभागात विभागपदी नेमणूक केली. या नियुक्तीबद्दल च्या झालेल्या आर्थिक चर्चेमुळे महापालिकेची बदनामी होत आहे. त्यांनी केलेल्या कारणांची पुरेशी शिक्षा देखील न होऊ देता त्यांना सेवेत रुजू केले. शहर स्वच्छतेत कामचुकार पणा मुळे हरित लवादाच्या तारखेला जाणीवपूर्वक हजर न राहिल्यामुळे पन्नास लाख रुपये महापालिकेला जमा करावे लागले पैठणकर यांच्या या कार्यपद्धतीमुळे सर्व शहरवासीय हैराण झाले आहेत पैठणकर यांना विचारणा केली असता महासभेत हवामान करून मधूनच निघून गेले त्यांची बदली  पुन्हा भविष्यात घनकचरा विभागात करू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक नळकांडे यांनी दिला होता. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त भालसिंग यांनी पैठणकर यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments