Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नेवासाफाटा येथे वंजारी समाजाचा मेळावा उत्साहातनगर रिपोर्टर
नेवासा -नेवासाफाटा येथील सप्तपदी मंगल कार्यालयात रविवारी दि.२५ ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील वंजारी समाजाच्या आयोजित मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्यात आपल्या न्याय हक्कासाठी वंजारी समाजाला एकत्रित करण्याचा निर्धार करण्यात येऊन “एकच मिशन वंजारी आरक्षण” हा नारा ही यावेळी देण्यात आला.वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत प्रश्न मांडू अशी ग्वाही नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी झालेल्या वंजारी समाज बांधवांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज तांदळे हे होते तर माणिकदौंडी येथील  आदिनाथ महाराज आंधळे,उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे, हरिभक्त परायण विष्णू महाराज सांगळे,जय भगवान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप, दहशत वादी विरोधी पथकात सेवा देणारे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव,संभाजी पालवे,बापूराव आव्हाड,राजेंद्र सानप मेळाव्याचे मार्गदर्शक व शिवसेना नेते रामदास गोल्हार,बाळासाहेब पवार,उद्धव आव्हाड,उदय पालवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी वंजारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष भिवाजी आघाव यांनी उपस्थित समाज बांधवांचे स्वागत केले तर डॉ.सचिन सांगळे यांनी प्रास्ताविक केले.संत भगवान बाबांच्या व संत वामनभाऊ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
जय भगवान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आपण कमी नाही एकजुटीची ताकद कायम ठेवा असे आवाहन केले.हरिभक्त परायण आदिनाथ महाराज आंधळे महाराज म्हणाले की आपले नेतृत्व मुंढे साहेब गेल्याने दयनीय अवस्था समाजाची झाली आहे यासाठी वंजारी समाज बांधवांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन केले.
हरिभक्त परायण पंढरीनाथ तांदळे महाराज यांनी अध्यक्षीय भाषणात वंजारी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जिद्द धरा सर्वांनी एकत्र या आपल्या हक्का साठी संघटित व्हा असे आवाहन केले.
या मेळाव्यात नेवासा तालुका वंजारी समाजाचे तालुकाध्यक्ष भिवाजी आघाव, उपाध्यक्ष सुभाष राख, गोरख घुले,खजिनदार डॉ.सचिन सांगळे, डॉ.रामनाथ बडे,उद्धव आव्हाड, अँड.किशोर सांगळे,शरद चेमटे,अशोक खाडे,प्रसिद्धी प्रमुख संजय पालवे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रा.अशोक गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर उद्धव आव्हाड यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments