Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात अवैध धंदे जैसे थे! पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
नगर रिपोर्टर
गुरुवार दि.२२
अहमदनगर - यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांंनी दि.१ जानेवारी ते ३१जुलै २०१९ या कालावधीत ६९० केसेस दाखल करण्यात आल्या. यामध्ये सुमारे ३४ कोटी १४ लाख ५ हजार ४३९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त ही करण्यात आला. असे असतानाही नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार यासह जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुसाट सुरू आहेत. हे कुणाच्या आशिर्वादाने असा एकीकडे सवाल उपस्थित केला जात असतानाच  याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष का? करीत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात अवैध धंद्यावर दाखल झालेल्या केसची संख्या पाहता जिल्ह्यामध्ये खुलेआम अवैध धंदे यात दारू जुगार मटका या धंदाचा मोठा सुळसुळाट झाला आहे. हातभट्टीवर दारु तयार करणार्‍याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा व अनेक ठिकाणी अगोदर मटका जुगार खेळला जात आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली असणा-या ७५ पोलिस कर्मचा-यांच्या पथकाने करण्यात आलेल्या कारवाईवर लक्षकेंद्रीत केल्यास यात ३८५ केसेस या दारू विक्री करणा-यांवर करण्यात आल्या आहेत. २२२ लोकांवर जुगार मटक्यांंबाबत कारवाई केली होती. तसेच अवैधरित्या वाळू उपसा करणा-यांंवरील कारवाई मध्ये वाळू वाहतुकीची साधने व वाळू जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात ाळू उपसा करणार्‍या ८३ जणांवर केसेस दाखल करण्यात आल्या होत्या एकूणच सात महिन्यांमध्ये अवैध धंद्या वरील कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने ३४ कोटी  १४ लाख ५ हजार ४३९ रुपयांंचा मुद्दे माल जप्त करण्यात आला होता. अशी मोठी कारवाई करुन ही पुन्हा अवैध धंदे कुणाच्या आशिर्वादाने चालतात, असा सवाल उपस्थित नाही झाला तर नवलच!
वास्तविक जिल्हा पोलिस प्रमुख ईशू सिंधू यांना पूर्णपणे अंधारात ठेवून जिल्हाभरात पोलिस प्रशासनात अनगोंदी कारभार सुरु आहेत. यात सिंधू साहेबांनी वैयक्तिक विश्वासू पोलिस कर्मचा-याचे पथक तयार करुन त्यांच्या कडून पोलिस प्रशासनातील  वास्तव घडामोडीवर लक्ष केंद्रित अनेक गोष्टी समोर येतील. परंतु यात जिल्हा पोलीस प्रमुखांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्हाभर अवैध धंद्याना उधाण आले आहे.

Post a Comment

0 Comments